Pondicherry च्या शुटिंगचा आजपासून शुभारंभ, वैभव तत्त्ववादी आणि सई ताम्हणकर सह सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक
दिग्दर्शक सचिन कुंडलकर सह कलाकारांनी या सिनेमाची पहिली झलक आज सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे.
'गुलाबजाम','वजनदार' या सिनेमातून हटके विषय रंजकपणे लोकांसमोर आणणारा दिग्दर्शक सचिन कुंडलकर (Sachin Kundalkar) यंदा 'पॉंडीचेरी' (Pondicherry) हा त्याचा आगामी सिनेमा घेऊन येणार आहे. या सिनेमामध्ये सई ताम्हणकर (SaieTamhankar), वैभव तत्त्ववादी (Vaibhav Tatwawaadi), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), नीना कुलकर्णी (Neena Kulkerni), महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाच्या शुटींगला आजपासून सुरूवात करण्यात आली आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर सह कलाकारांनी या सिनेमाची पहिली झलक आज सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे.
पॉंडीचेरी सिनेमाची पहिली झलक
पहिल्या शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये वैभव तत्त्ववादी आणि सई ताम्हणकर झळकत आहेत. 'दूर राहणार्या कुटुंबाची गोष्ट' अशी टॅग लाईन पोस्टरवर दिसत आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय आहे याबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. 'पॉंडीचेरी' हा सिनेमा केवळ स्मार्टफोनच्या माध्यमातून शूट केला जाणार आहे. सध्याया सिनेमाची टीम 'पॉंडेचेरी'मध्येच या सिनेमाचं शुटींग करण्यासाठी पोहचली आहे. Sachin Kundalkar यांनी सोशल मीडियातून शेअर केला Pondicherry टीमचा पहिला फोटो !
पॉंडेचेरी सिनेमाच्या रीलिज डेटबद्दलही खुलासा करण्यात आलेला नाही. या सिनेमाची निर्मिती नील पटेल करणार आहेत. तर कथा तेजस मोडक आणि सचिन कुंडलकर यांनी लिहली आहे.