‘Paani’ Movie Review: एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची प्रेरणादायी कथा

नागदरवाडीच्या निसर्गचित्रणाचे वास्तव चित्रपटाच्या सुरुवातीला प्रभावीपणे मांडले आहे.

‘Paani’ Movie Review:  मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे यांच्या आयुष्यावर प्रेरित होऊन सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात हनुमंत केंद्रे या महान व्यक्तीचं आयुष्य जवळून जाणून घेता येते. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटात हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे स्वतः साकारणार असून यात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशा दमदार कलाकारांची फौज आहे. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.  ( हेही वाचा - Marathi Film Paani Release Date: प्रियंका चोप्रा निर्मित, आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी'; येत्या 18 ऑक्टोबरला प्रदर्शित )

पाहा चित्रपटाचा ट्रेलर 

मराठवाड्यातील नागदरवाडी येथील हनुमंत (आदिनाथ कोठारे) हा दुसऱ्या गावातील सुरवणा (रुचा वैद्य) साठी संभाव्य वर आहे. परंतु, नागदरवाडीतील पाण्याच्या समस्येमुळे सुवर्णाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले आहे. हनुमंत हे मनावर घेतो. आपल्या गावातील कोरड्या विहिरी आणि कोरडवाहू जमिनीमुळे आपले जीवन उद्ध्वस्त झाल्याचे त्याला वाटते. हनुमंत आणि सुवर्णा एकमेकांवर प्रेम करतात. सुवर्णाशी लग्न करण्याचा निश्चय केलेला हनुमंत नागदरवाडीतील जलसंकट सोडवण्याचे वचन देतो. अशा प्रकारे त्याचा खडतर प्रवास सुरू होतो.

पाणी सामाजिक आणि पर्यावरणीय संवेदनशीलता दाखवते. नागदरवाडीच्या निसर्गचित्रणाचे  वास्तव चित्रपटाच्या सुरुवातीला प्रभावीपणे मांडले आहे. पण चित्रपट खूप मंद गतीने पुढे जातो, काही वेळा प्रभाव पाडण्यात कमी पडतो. कथेत सत्य घटनांचे वर्णन करताना दिग्दर्शकाला इतक्या चांगल्या रितीने जमले नाही त्यामुळे चित्रपटाच्या पूर्वार्ध हा संथ वाटतो. याव्यतिरिक्त, हनुमंतचे संघर्ष आणि स्थानिक राजकारण यांचा समतोल साधण्यात दिशा कमी होते. तथापि, दुसऱ्या भागातकथेला अधिक मजबूत पकड मिळते, परिणामकारक क्लायमॅक्स पहायला मिळतो.