IPL Auction 2025 Live

National Film Awards 2019: 'भोंगा' राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित

भोंगा चित्रपटास भारत सरकारचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या श्रेणीत भोंगा चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटासोबतच इतर भाषांतील चित्रपटांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Bhonga

National Film Awards 2019: तिकीटबारीवर फारसा न टिकलेला पण, समीक्षक आणि जाणकार प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या भोंगा (Bhonga) चित्रपटाने आणखी एक दमदार मजल मारली आहे. भोंगा (Marathi Feature Film Bhonga) चित्रपटास भारत सरकारचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या श्रेणीत भोंगा चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटासोबतच इतर भाषांतील चित्रपटांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दरम्यान, राजधानी दिल्ली येथील श्त्री भवन येथे 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (9 ऑगस्ट 2019) करण्यात आली. पुरस्कार निवड समितीमधील सदस्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सपूर्त केलेल्या अंतिम निकालाच्या यादीनुसार हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. महत्त्वाचे म्हणचे श्रीनिवास पोकळेला याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार मिळाला.

भोंगा चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांचे आहे. तर, निशांत धापसे यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रमणीरंजन दास यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे. तर, निलेश गावंड यांचे संकलन आहे. सुबोध पवार यांनी चित्रपटासाठी गीत लेखन केले आहे. (हेही वाचा, 56 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात Carol Littleton चा मराठमोळा अंदाज ठरला लक्ष्यवेधी; 'भोंगा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट)

नलिनी प्रोडक्शनसची निर्मीती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते शिवाजी लोटन पाटील व अरुण महाजन आहेत. चित्रपटाचे कलादिग्दर्शन संतोष समुद्रे यांचे आहे. महेंद्र टिसगे हे भोंगाचे कार्यकारी निर्माते आहेत. भोंगाच चित्रपटास पुरस्कार मिळाल्याची बातमी समजल्यानंतर दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यानी आनंद व्यक्त केला.