Lockdown मध्ये मराठी सेलिब्रिटींचं #MeAt20 Challenge; पहा सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे सहित 'या' कलाकारांचे तरुणपणीचे फोटो

#MeAt20 नावाचा नवा चॅलेंज आता ट्रेंड होत आहे. यात आपले तरुणपणीच म्हणजेच 20 वर्षाचे असतानाचे फोटो लोक शेअर करत आहेत. मराठी चित्रपट इंडस्ट्री मधील अनेक कलाकारांनी हा ट्रेंड फॉलो करत आपले तरुणपणीच फोटो शेअर केले आहेत.

Marathi Celebrity #MeAt20 Challenge (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात 3 मे पर्यंत लॉक डाऊन (Lockdown) जारी करण्यात आले आहे, अशावेळी घरात अडकून पडलेल्या सर्वांनाच कंटाळा कसा घालवावा हा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी सोशल मीडियावर शोधले आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅलेंज मधून अनेक जण आपला वेळ घालवत आहेत. मग यामध्ये कधी साडी नेसलेला फोटो पोस्ट करणे, कधी सगळ्यात विचित्र फोटो अपलोड करणे, कधी पार्टनर सोबत तर कधी मित्रांसोबत फोटो पोस्ट करणे असे अनेक चॅलेंज सध्या ऑनलाईन हिट होत आहेत, असाच एक #MeAt20 नावाचा नवा चॅलेंज आता ट्रेंड होत आहे. यात आपले तरुणपणीच म्हणजेच 20 वर्षाचे असतानाचे फोटो लोक शेअर करत आहेत. मराठी चित्रपट इंडस्ट्री मधील अनेक कलाकारांनी हा ट्रेंड फॉलो करत आपले तरुणपणीच फोटो शेअर केले आहेत. यामध्ये स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी यासहित अनेक कुलकर्णी आपले फोटो पोस्ट केले आहेत. या कलाकारांच्या तरुणपणीच्या फोटोंची झलक इथे पहा.. सुष्मिता सेन हिच्या Miss India 1994 Winning Gown ची प्रेरणादायी कहाणी! कुण्या फॅशन डिझायनरने नव्हे तर गॅरेज मधील शिंप्याने शिवला होता 'हा' सुंदर ड्रेस (Watch Video)

सुबोध भावे

 

View this post on Instagram

 

#MeAt20 तेव्हा मला अभिनयात करियर करण्यात शून्य रस होता,मला मॉडेलिंग करायचं होतं. आणि त्या साठी माझं पाहिलं फोटोशूट केलं होतं @avigowariker (अविनाश गोवारीकर)यांनी. फोटोशूट ला तेव्हा ही नर्व्हस असायचो आणि आजही😁😁😁

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

सोनाली कुलकर्णी

 

View this post on Instagram

 

#throwbackthursday Major #TBT Picture here.... On that note want to thank my old, or should I say my younger self!!!!!!!!!!!A simple, vibrant, and ambitious yet a naive girl...... जिच्या डोळ्यात बघून कळतं की हिला आयुष्यात खूप काही करायचंय I am what I am today because of this little one here😉 #sonaleekulkarni #oldpicture

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

View this post on Instagram

 

Here is #MeAt20 Photo by - Gautam Rajadhyaksha ❤️❤️❤️ #throwback

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul) on

सिद्धार्थ जाधव

 

View this post on Instagram

 

"झी सिनेस्टार की खोज" नावाच्या Zee tv वरच्या acting talent hunt शो मध्ये participate व्हायचं होत मला पण कुणीतरी सांगितलं मला की फोटो पाहिजे.. त्या शिवाय नाही जाता येतं.. म्हणून ऑडिशन हॉल च्या बाजूला असलेल्या एका लोकल फोटोग्राफर कडे काढलेला फोटो.. त्या झी सिनेस्टार की खोज मध्ये माझं काही सिलेक्शन झालं नाही, पण आयुष्यात एक वेगळीच गोष्ट सापडली ..."आपला सिध्दू "...... खूप मस्त आहे ना हा..?! #MeAt20

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

स्वप्नील जोशी

 

View this post on Instagram

 

Me at 20, 30, 40... Age is an issue of mind over matter. If you don't mind it doesn't matter. ✌️ . . . #MeAt20 #challenge #SwwapnilJoshi

A post shared by 𝕊𝕨𝕒𝕡𝕟𝕚𝕝 𝕁𝕠𝕤𝕙𝕚 (@swwapnil_joshi) on

हेमांगी कवी

 

View this post on Instagram

 

Me at 20 #navinchallenge #नविनखुळ तेव्हा आता सारखे mobile नव्हते, so selfies, सतत चे photos ही नव्हते. School, colleges मधले Special days, birthdays, लग्न किंवा मग gatherings तेव्हाच photo काढले जायचे! So हा माझ्या college काळातला traditional day चा photo! No change, अजूनही तशीच दिसते वगैरे वगैरे ... येऊ देत! 🙈🙈😂😂 #meat20 #Meat20 #college #sirjjschoolofart #fineart #campus #sareeday #traditionalday #nostalgia #challenge #jjcampus #kavihunmain #hemangikavi

A post shared by Hemangii Kavi (@hemangiikavi) on

प्रार्थना बेहरे

 

View this post on Instagram

 

Little me ...pure nostalgia - part 3 . #flashback #memories💕 #21dayslockdown #happyquarantine #stayhome #stayhealthy #staysafe #staypositive #socialdistancing #day16 #day16quarantine

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere) on

दरम्यान, 3  मे पर्यंत तरी मालिका तसेच सिनेमाचं चित्रीकरण बंद असणार आहे. त्यामुळे कधी नव्हे तर ही सेलिब्रिटी मंडळी घरातच अडकून आहेत. तुम्हीही घरी बसून वैतागला असाल तर हे असे ट्रेंड फॉलो करायला काहीच हरकत नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now