गायक नंदेश उमप यांनी Coronavirus वर रचला पोवाडा, नक्की ऐका

नंदेश उमप यांच्या हातखंडा असलेल्या पोवाड्याच्या माध्यमातूनच त्यांनी नागरिकांना कोरोना विरुद्ध लढण्याबाबत जनजागृती निर्माण केली आहे.

Nandesh Umap (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसची (Coronavirus) देशातील गंभीर स्थिती लक्षात घेता सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वे सेलिब्रिटीज, दिग्गज नेते संदेश देत आहेत. यात कोणी कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी कोणी गाणं तयार करत आहे तर कोणी कविता. प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून कोरोना बाबत जनजागृती निर्माण करत आहे. मराठीतील सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप (Nandesh Umap) यांनी असेच काहीसे केले आहे मात्र आपल्या अंदाजात. नंदेश उमप यांच्या हातखंडा असलेल्या पोवाड्याच्या माध्यमातूनच त्यांनी नागरिकांना कोरोना विरुद्ध लढण्याबाबत जनजागृती निर्माण केली आहे.

गायक नंदेश उमप यांना कोरोना ने जरी आपल्यावर हल्ला केला असेल तर आम्ही कोरोनाला घाबरणार नाही आणि हिंमतीने त्याचा सामना करु असे या पोवाड्यात म्हटले आहे.

पाहा नंदेश उमप यांचा पोवाडा:

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने देखील कोरोना विरुद्ध लढण्यासंदर्भात एक सुंदर कविता लिहून ही कविता आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली होती. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने Coronavirus शी लढा देण्यासाठी आपल्या कवितेतून चाहत्यांना दिला मोलाचा संदेश

 

View this post on Instagram

 

मी आणि माझ्या घरची मंडळी काळजी घेत आहोत, तुम्हीही स्वतः ची नीट काळजी घ्या. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनीच हे संकट लवकर दूर होईल. 😷🙏💪 #nocorona #besafe #becareful #beclean #corona #washyourhands #saveworld

A post shared by Mukta Barve (@muktabarve) on

त्याचबरोबर बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील कोरोना व्हायरस विरुद्ध एक भोजपुरी कविता केली होती. भारतात कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा 236 वर जाऊन पोहोचला आहे.