Kiss Day 2020: हॉट किसिंग सीन्समुळे गाजलेली मराठीतील '5' हिट गाणी, नक्की पाहा (Watch Video)

आजच्या किसिंग डे च्या निमित्ताने आपण अशीच काही हॉट किसिंग सीन्समुळे गाजलेली मराठीतील '5' हिट गाणी पाहणार आहोत. काय मग Excited आहात ना?

Kiss Day Hot Scenes In Marathi Movie (Photo Credits: Youtube)

व्हॅलेंटाईन वीक मध्ये आज म्हणजेच 13 फेब्रुवारीला किस डे (Kiss Day)  साजरा केला जातो, साधारणतः शारीरिक स्पर्श हा प्रेमाच्या नात्यातील अंतिम टप्पा मानला जातो, स्वतःला एकमेकांच्या हाती सोपावून आपल्या प्रेमाची ग्वाही देण्याचा हा दिवस आहे. कधीकाळी चारचौघात बोलली सुद्धा न जाणारी ही गोष्ट कालानुरूप आता काही फार निषिद्ध उरलेली नाही. आज आपल्याकडील अनेक सिनेमांमधून, मालिकांमधून असे किसिंग सीन्स सर्रास दाखवले जातात. मराठी सिनेमाही काही यामध्ये मागे नाही. जोगवा या सिनेमात मुक्ता बर्वे (Mukta Barve)  आणि उपेंद्र लिमये (Uprendra Limaye)  यांनी या लीप लॉक ट्रेंडची (Lip Lock Kissing) सुरुवात केली आणि मग अनेक सिनेमांमधून प्रेमाच्या नात्यातील हा नाजूक क्षण अगदी रोमॅन्टिक आणि लार्जर दॅन लाईफ बनवून दाखवला जाऊ लागला. आजच्या किसिंग डे च्या निमित्ताने आपण अशीच काही हॉट किसिंग सीन्समुळे गाजलेली मराठीतील '5' हिट गाणी पाहणार आहोत. काय मग Excited आहात ना?

Kiss Day 2020 Gift Ideas: 'व्हॅलेंटाईन विक'मध्ये आपल्या जोडीदालाला द्या हे खास गिफ्ट आणि साजरा करा 'किस डे'

जीव दंगला

मराठी सिनेमातील पहिले किस 'जोगवा' सिनेमात पाहायला मिळाले. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उपेंद्र लिमये यांनी मराठी सिनेसृष्टीतील चौकट मोडत सिनेमाच्या मागणीखातर किसिंग सीन देण्याचं धाडस केलं. त्यांचे हे धाडस चांगलेच गाजले.

ये चंद्राला

टकाटक या कॉमेडी सिनेमातील ये चंद्राला या गाण्यात नवोदित कलाकार प्रणाली भालेराव आणि अभिजित अमकर यांची हॉट केमिस्ट्री ही सिनेमापेक्षा जास्त हिट ठरली होती.

नको नको ना रे

तू हि रे सिनेमातील नको नको ना रे या गाण्यात ऑल टाइम हिट जोडी स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता.

 

चांद मातला

लाल इश्क या सिनेमात स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी यांची हॉट रोमँटिक केमिस्ट्री आणि भव्य दिव्य सेट यामुळे चांद मातला हे गाणे चांगलेच गाजले होते.

 

कुठे हरवून गेले

Whatsup लग्न या सिनेमात कुठे हरवून गेले या गाण्यात वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची भावनिक जवळीक आणि तितकाच हॉट रोमान्स पाहायला मिळाला होता.

किसिंग सीन देणे हे काही आता मराठी कलाकारांसाठी वावगे उरलेले नाही, इतकंच कशाला तर 'मित्रा' सिनेमात मृण्मयी देशपांडे आणि वीणा जामकर या दोन अभिनेत्रींचा तर अलीकडेच प्रिया बापट हिचा सिटी ऑफ ड्रीम्स सिरीज मधील अनोखा बोल्ड सीन सुद्धा ऑनस्क्रीन हिट वाढवणारी ठरला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now