Sher Shivraj: ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध
प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांचेही कौतुक मिळवत जगभरात गाजलेला मराठी ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज (Sher Shivraj) आता जगभरातील प्रेक्षकांना घरबसल्या अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून पाहाता येणार आहे.
प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांचेही कौतुक मिळवत जगभरात गाजलेला मराठी ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज (Sher Shivraj) आता जगभरातील प्रेक्षकांना घरबसल्या अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून पाहाता येणार आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित आणि दिग्दर्शित हा भव्य चित्रपट शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्त्वाच्या अध्यायावर आधारित आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवासावर आधारित फ्रँचाईझीतील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड यांच्यानंतरचा चौथा सिनेमा आहे. शेर शिवराजमध्ये या महान मराठी राजाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि धाडसी प्रसंगाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र आदिलशाहीच्या शासनाखाली चिरडून निघत होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं असामान्य बुद्धी चातुर्य आणि धाडसाच्या जोरावर अफझल खानला हरवलं. चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका केली असून मुकेश ऋषी बलशाली अफझल खानच्या भूमिकेत आहेत.
Tweet
मुंबई मूव्ही स्टुडिओजचे नितिन केणी, प्रद्योत पेंढारकर आणि राजवारसा प्रॉडक्शनचे अनिल नारायणराव वानखेडे आणि दिग्पाल लांजेकर आणि मुळाक्षरचे चिन्मय मांडलेकर यांनी शेर शिवराजची निर्मिती केली आहे. चिन्मय मांडलेकर आणि मुकेश ऋषी यांच्याशिवाय सिनेमाच्या कास्टमध्ये मृणाल कुलकर्मी, अजय पुरकर, बिपिन सुर्वे, रोहन मंकणी यांचा समावेश आहे. हा भव्य ऐतिहासिक सिनेमा आता अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून भारत आणि 240 देशांत उपलब्ध करण्यात आला आहे.