Happy Birthday Dada Kondke: दादा कोंडकेंचे चित्रपट सुपरहिट होवून देखील टिव्हीवर प्रदर्शित करण्यास का होती बंदी? जाणून घ्या दादांच्या वाढदिवशी ही खास बाब
आज दादा कोंडके आपल्यात नसले तरी त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,यातून दादा या जगात नसलेत तरी प्रत्येकांच्या मनात आहेत ही बाब नक्कीचं दिसून येते.
दादा कोंडके म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार. दिवंगत दादा कोंडके आज आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे त्यांचे गाणे (Songs) आजही अजरामर आहेत. आजही त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे चित्रपट, चित्रपटातील डायलॉग्स (Dialogues)-गाणी आजही लोक तेवढ्याचं आवडीने ऐकतात. तसेच दादांना फक्त महाराष्ट्रात (Maharashtra) नाही तर देशभरात चाहता वर्ग आहे. दादा कोडकेंचे सिनेमे प्रदर्शित व्हायचे तेव्हा ब्लॅकमध्ये देखील तिकीट (Black Tickets) मिळणे अशक्य व्हायचे. आजही सगळ्यांना दादांचे सिनेमे बघायला आवडतात. पण दादा कोंडकेंचे सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामूळे दादांची गाणी किंवा सिनेमा प्रेक्षकांना आता पुन्हा बघाचे असल्यास ते शक्य नव्हते. पण दादा कोंडके मराठीतील सुपरस्टार (Superstar) पण त्याचे सिनेमा कुठेचं का प्रदर्शित केल्या जात नव्हते या मागे एक विशेष कहाणी दडली आहे.
गेल्या 15 वर्षांपासून दादा कोंडकेंच्या (Dada Kondke Movies) सिनेमाबाबत खटला सुरु होता. दादा कोंडकेंच्या (Dada Kondke) सून माणिक मोरे (Manik More) आणि ‘नुपूर’ कंपनीत (Nupur company) दादा कोंडकेंच्या चित्रपटांच्या हक्कांवरून न्यायालयात खटला सुरू होता. त्यामुळे दादा कोंडकेंचा कुठलाही सिनेमा टीव्हीवर (TV) प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली होती. कारण ‘नुपूर’ कंपनीने दादा कोंडकेच्या चित्रपटांच्या बनावट सीडी (CD) आणि डीव्हीडी (DVD) तयार करून विकल्याचा माणिक मोरे यांचा आरोप होता. यासंदर्भात माणिक मोरेंनी नुपूर कंपनीविरोधात पुणे (Pune) सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.(हे ही वाचा:- Bigg Boss 15 विजेती Tejasswi Prakash मराठी सिनेमात; Man Kasturi Re मधून Abhinay Berde सोबत रसिकांच्या भेटीला)
पण आता या खटल्याचा निकाल दादा कोंडकेंच्या सून माणिक मोरंच्या बाजूने देण्यात आला आहे. त्यामुळे आता माणिक मोरंच्या संमतीसह दादा कोंडकेंचे चित्रपट आता टीव्हीवर सहज प्रदर्शित केल्या जावू शकतात. आज दादा आपल्यात नसले तरी त्यांच्या वाढदिवशी (Birthady) चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,यातून दादा या जगात नसलेत तरी प्रत्येकांच्या मनात आहेत ही बाब नक्कीचं दिसून येते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)