Girlfriend Movie Review: नात्यामधील प्रेमाची भावना उलगडत चेहऱ्यावर हसू आणणारी 'Girlfriend' आयुष्यात जरुर भेटावी!
सिंगल म्हणून मनात कुठेतरी खंत व्यक्त करणाऱ्या तरुणांना आपल्याला सुद्धा गर्लफ्रेंड हवी अशी इच्छा व्यक्त करतात. उघडपणे याबद्दल कधी कोणाला बोलून दाखवत नाहीत. मात्र एकट्यात असल्यावर आयुष्यात येणारी खास व्यक्ती ती कशी असावी, तिच्यासोबतचे क्षण याबद्दल विचार करत स्वत: मध्येच ती नसूनसुद्धा तिच्या असण्याचे विश्व तयार करतात.
Girlfriend Marathi Movie Review: सिंगल म्हणून मनात कुठेतरी खंत व्यक्त करणाऱ्या तरुणांना आपल्याला सुद्धा गर्लफ्रेंड हवी अशी इच्छा व्यक्त करतात. अशी इच्छा बाळगणारे तरुण प्रेमप्रकरणाबद्दल विषय निघाल्यास उघडपणे याबद्दल कधी कोणाला बोलून दाखवत नाहीत. मात्र एकट्यात असल्यावर आयुष्यात येणारी खास व्यक्ती ती कशी असावी, तिच्यासोबतचे क्षण याबद्दल विचार करत स्वत: मध्येच ती नसूनसुद्धा तिच्या असण्याचे विश्व तयार करतात. एकदा का प्रेमाचे नाते जुळले की आयुष्यातील प्रत्येक अनमोल क्षणावेळी ती खास व्यक्ती आपल्यासोबत हवी असे वाटते. तसेच सोशल मीडियावर आपल्या खास व्यक्तीसोबतचे फोटो पोस्ट करत व्यक्त केला जाणारा आनंद हा वेगळ्याच प्रकारचा असतो. अशाच पद्धतीचा उपेंद्र सिधये (Upendra Sidhaye) दिग्दर्शित 'गर्लफ्रेंड' (Girlfriend) हा सिनेमा प्रत्येकाच्या मनाला मोहून टाकणारा आहे.
गर्लफ्रेंड चित्रपटात नचिकेत (अमेय वाघ) याचा वाढदिवस असावा तर कधी 14 फेब्रुवारी अर्थातच व्हेलेंटाईन्स डे. रात्रीची वेळ मोबाईल आणि कप्युटरवर सुरु असलेल्या फेसबुकच्या माध्यमातून वाढदिवसाच्या कोण शुभेच्छा देत आहे का याची वाट पाहतो. त्याची नजर मोबाईल आणि फेसबुक यावर खिळून राहिलेली असते. नेहमीप्रमाणेच या वाढदिवासालासुद्धा कोणाच्या शुभेच्छा तर नाहीच म्हणा पण साधी एक गर्लफ्रेंड पटवता आली नाही याची मनात खंत. घरातील वातावरण खेळीमेळीचे असणारी मंडळी त्याला सकाळी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. नचिकेतला वाढदिवसाच्या सकाळी ऑफिसमधील भेटलेली मैत्रीण श्वेता (रसिका सुनील) त्याला वाढदिवसाच्या नाही तर व्हेलेंटाईन्स डे कोणासोबत साजरा करणार याबद्दल विचारते. पुन्हा एकदा मनात तिच निराशा आणि कामाला सुरुवात. नचिकेत तु एका रात्रीत गर्लफ्रेंड पटवलीस याचा आनंद वडील व्यक्त करतात. वडिलांना अलिशा नेरुरकर (सई ताम्हणकर) असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव सांगतो.
नचिकेतला एका क्षणासाठी समजत नाही हे कस शक्य आहे. नचिकेत रिलेशनशिप मध्ये असल्याचे नोटिफिकेशन आणि बरेच मेसेज-फोन. अलिशाचे ऑफिसमध्ये अचानकपणे येणे सर्वांना आर्श्चचकीत करते. येथून पुढे नचिकेत आणि अलिशा यांच्यात भेटीगाठी सुरु होतात. एखाद्या खास व्यक्तीचे आयुष्यात येण्याने किती बदल होतात, चेहऱ्यावर किती हसू उमटते याचा प्रत्यय वेळोवेळी नचिकेतच्या चेहऱ्यावर दिसून येतो.
एक दिवस असा येतो की खरचं आपण ब्रेकअप करायचा का? असा प्रश्न दोघांसमोर उभा राहतो. या प्रश्नानंतर अलिशा आणि नचिकेत काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी गर्लफ्रेंड सिनेमा आवर्जून पहावा. गर्लफ्रेंड हा चित्रपट फक्त प्रेमीयुगलुकांसाठी नव्हे तर घरातील मंडळींनीसुद्धा पाहण्यासारखा आहे. चित्रपटात प्रत्येक व्यक्तीरेखांनी आपल्या भुमिकेमध्ये उत्तमपणे काम केल्याचे दिसून येते. तसेच चित्रपटातील विनोद आणि संवाद उत्तमरित्या मांडण्यात आले आहेत. आलिशा आणि नचिकेतसह चित्रपटातील सहकलाकारांनीसुद्धा आपल्या भुमिका योग्यरितीने पार पाडल्या आहेत. त्याचसोबत चित्रपटातील गाणीसुद्धा प्रेक्षकांना हसवणारी आणि आनंदित करणारी आहेत. तर गाण्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास स्पॅनिश अंदाजातील गाणे प्रेक्षकांच्या मनाला मोहणारे ठरणार आहे.
सारांश:
गर्लफ्रेंड म्हणजे काय आयुष्यातील एक खास व्यक्ती. तिच्या येण्याने किती गोष्टी बदलतात आपल्या स्वभावात किती फरक जाणवू लागतो याचा प्रत्येय गर्लफ्रेंड चित्रपटातून येतो. तसेच घरातील खेळीमेळीचे वातावरण आणि नव्या पिढीच्या कलेने काही गोष्टी घेतल्या तर त्या कशा पद्धतीने पूर्ण होतात याचे वर्णन यामधून दिसते. नचिकेत आणि अलिशा यांचे नाते मनाला स्पर्श करुन जाणारे आहे. मात्र सध्याच्या बदलत्या पिढीनुसार प्रेमाचे नाते कोणत्या कलेने घेतले जाते यासाठी गर्लफ्रेंड हा चित्रपट प्रत्येकाने जरुर पाहावा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)