'आनंदी गोपाळ', 'भोंगा' ची IFFI मध्ये बाजी; एकूण पाच मराठी चित्रपटांची निवड
आणि विशेष म्हणजे 1952 साली सुरू झालेल्या या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदाचे हे 50 वे वर्ष आहे.
‘इफ्फी’ हा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा गोव्यात रंगणार आहे. आणि विशेष म्हणजे 1952 साली सुरू झालेल्या या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदाचे हे 50 वे वर्ष आहे.
यंदाच्या ‘इफ्फी’ 2019 मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या विभागात यंदा 5 मराठी सिनेमांचा समावेश असणार आहे. 2018 साली या विभागात फक्त दोनच सिनेमांचा समावेश होता.
पण या वर्षी मात्र देशातील एकूण 26 हिंदी चित्रपांचा समावेश असेल. तसेच विविध प्रादेशिक चित्रपटातून ही निवड झाली आहे. त्यातील मराठी विभागात समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ', सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला', शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, अनंत महादेवन यांचा ‘माई घाट : क्राईम नंबर 103/2005 व आदित्य राही आणि गायश्री पाटील यांचा ‘फोटो प्रेम' या चित्रपटांचा समावेश आहे.
हा चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबरपासून 28 नोव्हेंबरपर्यंत गोव्यामधील पणजी येथे पार पडणार आहे.