लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाद्वारे सायली संजीव चाहत्यांच्या भेटीला; पहिले पोस्टर प्रदर्शित (Photo)

अशात सायलीने तिच्या नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज आपल्यासोबत शेअर केले आहे. 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) असे या चित्रपटाचे नाव असून, यामध्ये पैठणीच्या पदरामागे सायली उभी असलेली दिसून येत आहे.

गोष्ट एका पैठणीची (Photo Credit : Twitter)

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून एक वेगळी ओळख प्राप्त झालेली अभिनेत्री, सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने आता आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळविला आहे. 2019 मध्ये सायलीचे दोन महत्वाचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सायलीच्या ‘AB आणि CD''सातारचा सलमान' (Satarcha Salman) या दोन्ही चित्रपटांचे काम पूर्ण झाले असून, हे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. अशात सायलीने तिच्या नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज आपल्यासोबत शेअर केले आहे.  'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) असे या चित्रपटाचे नाव असून, यामध्ये पैठणीच्या पदरामागे सायली उभी असलेली दिसून येत आहे. सायलीने आतापर्यंत अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत, त्यामुळे या चित्रपटातही ती काहीतरी नवे आणि वेगळे देण्याचा प्रयत्न करीत आहे हे या पोस्टरवरून दिसत आहे.

गोष्ट एका पैठणीची पोस्टर -

 

View this post on Instagram

 

माझ्या अभिनयाच्या प्रवासातलं सगळ्यात सुंदर वळण म्हणजे “पैठणी” हा चित्रपट. यासाठी मी @akshaybardapurkar @shantanurode आणि team @planet.marathi @planetmarathitalent चे कसे आभार मानू तेच कळत नाही. मी ऋणी आहे तुमची. ही “पैठणी” मला मनापासून...कष्टाने विणायची आहे. त्यासाठी तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या हीच विनंती..! “गोष्ट एका पैठणीची” • • • #marathifilm #paithani #goshtaekapaithanichi #planetmarathi #planetmarathitalent #sayalisanjeev #blessed

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on

आपल्या सोशल मिडीयावर हे पोस्टर शेअर करताना सायली लिहिते, ‘माझ्या अभिनयाच्या प्रवासातले सगळ्यात सुंदर वळण म्हणजे ‘पैठणी’ हा चित्रपट. ही ‘पैठणी’ मला मनापासून...कष्टाने विणायची आहे. त्यासाठी तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या हीच विनंती..!’ हे पोस्टर पाहिल्यावर सायली तिच्या भूमिकेशी किती समरस झाली आहे हे लक्षात येते. गोड हसरा चेहरा आणि बोलके डोळे हे सायलीच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य या पोस्टरमध्येही स्पष्ट दिसून येते.

(हेही वाचा: सातारचा सलमान सिनेमाचे Title Song प्रेक्षकांच्या भेटीला; शिवानी सुर्वे, सायली संजीव आणि सुयोग गोऱ्हे यांचा भन्नाट कल्ला)

महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा असलेल्या पैठणी साडीवर या चित्रपटाची कथा बेतली असावी असा प्राथमिक अंदाज येत आहे. शंतनू रोडे (Shantanu Rode) हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, 24 नोव्हेंबरपासून याच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now