Devmanus Actor Kiran Gaikwad: 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा किरण आणि वैष्णवीचा पाहायला मिळाला. या लग्नसोहळ्याला ‘लागिरं झालं जी’ या मालिकेची संपूर्ण टीमने हजेरी लावली होती.
Devmanus Actor Kiran Gaikwad: अभिनेता किरण गायकवाडचे अलीकडेच लग्न झाले. त्याने 14 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. किरणची 'देवमाणूस' ही मालिका प्रचंड गाजली होती, या मालिकेतील अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत किरणने लग्न केले. बऱ्याच काळापासून किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांनी नातं लपवून ठेवलं होतं. 29 नोव्हेंबरला किरण-वैष्णवीने प्रेम जाहीर केलं. किरण गायकवाडने सोशल मिडीयावर पोस्टकरत आपल्या नात्याची कबूली दिली होती. किरण यांनी आपल्या पोस्टमध्ये आपल्या लग्नाची तारीख देखील त्यावेळी जाहीर केली होती. (हेही वाचा - Upcoming OTT-Theatres Release: मुफासा: द लायन किंग ते बेबी जॉनपर्यंत 'हे' चित्रपट पुढील आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित)
पाहा पोस्ट -
अभिनेता किरण गायकवाडView this post on Instagram
पाहा व्हिडिओ -
या दोघांनी मराठमोळ्या पद्धतीने आपला लग्न सोहळा साजरा केला. मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा किरण आणि वैष्णवीचा पाहायला मिळाला. या लग्नसोहळ्याला ‘लागिरं झालं जी’ या मालिकेची संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. या मालिकेतील अभिनेता अमरनाथ खराडे, निखिल चव्हाण, सुमीत पुसावळे, महेश जाधव, राहूल मगदुम आणि पूर्वा शिंदे यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता.