Bigg Boss Marathi 5: आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घेणार सगळ्यांचा क्लास; पाहा कोणाचा हिशोब होणार

यावरुन या सर्वांची शाळा रितेश 'भाऊचा धक्का' मध्ये स्पर्धकांची घेणार आहे.

आज आहे. या सीझनमधील हा दुसरा 'भाऊचा धक्का' आहे. या एपिसोडमध्ये रितेश देशमुख कोणकोणत्या स्पर्धकांचा क्लास घेणार? तसेच कोणकोणत्या स्पर्धकाला कानमंत्र देणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार असून या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार हे देखील समजणार आहे. (हेही वाचा -  Bigg Boss Marathi 5: निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस; बिग बॉसच्या प्रोमाचा व्हिडिओ व्हायरल)

दुसऱ्या आठवड्यामध्ये स्पर्धकांमध्ये आपआपसात जोरदार राडे आणि आपआपसांतील वाद आपल्याला पाहायला मिळाला. यावरुन या सर्वांची शाळा रितेश 'भाऊचा धक्का' मध्ये स्पर्धकांची घेणार आहे. शिवाय, कॅप्टन्सी टास्क दरम्यान झालेले वाद या सर्वांवर रितेश आज सर्वच स्पर्धकांची शाळा घेणार आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

बिग बॉस मराठीच्या घरातील पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली आहे. या आठवड्यात, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, निखिल दामले, घन:श्याम दराडे आणि पंढरीनाथ कांबळेला एलिमिनेट करण्यात आले आहे. आता या स्पर्धकांमधून कोणता स्पर्धक नॉमिनेट होणार ? हे पहावे लागेल. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवर 'भाऊचा धक्का'चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रितेश देशमुख म्हणतो, "आठवड्याभरात अनेकांचे डिसिजन्स चुकले, काही विनाकारण भांडले, काहींनी संधी मिळालेले डाव सोडले, या सर्वांवर करूयात टीका " यामध्ये, आर्या आणि निक्की, जान्हवी आणि सूरज, अरबाज आणि अभिजित यांच्यात झालेल्या वादाचे काही शॉर्ट्स पाहायला मिळत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif