Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरातील खरा गद्दार म्हणून अरबाजने घेतलं वैभवचं नाव; सर्वच सदस्यांना बसला धक्का

''चा सीझन 5 सुरू असून  हा शो सुरू झाल्यापासून बिग बॉसच्या घरामध्ये राडे, भांडणं पाहायला मिळत आहे. रितेश देशमुख देखील भाऊच्या धक्क्यावर घरामध्यल्या सदस्यांची चांगली शाळा घेत आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख अभिनेता वैभव चव्हाणची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरातील खरा गद्दार कोण? असा सवाल रितेश देशमुख घरातील सदस्यांना विचारतो. यावर अरबाज पटेलने थेट वैभवचं नाव घेतलं. त्यामुळे घरातील सर्व सदस्य चकीत झाले आहेत. बिग बॉसचा नवा प्रोमो व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Bigg Boss Marathi 5 Emotional Call: घरच्यांशी फोनवर बोलताना बिग बॉसच्या सदस्यांना अश्रू अनावर; पहा हृदयस्पर्शी व्हिडिओ)

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख 'या घरातील गद्दार कोण आहे?' असा प्रश्न विचारतो. त्यावर अरबाज वैभवचे नाव घेताना दिसत आहे. रितेश म्हणतो की, 'तुम्ही जर असे म्हणाला असताना वैभव की मला तुम्ही तुमच्या टीममधला समजू नका. हे बोलायला जिगर लागते जिगर. हे बाजारात प्रोटिनच्या डब्यात नाही मिळत. आम्ही आतमध्ये वैभव पाटवला आहे. गद्दार म्हणून बाहेर येऊ नका.'

बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये कॅप्टन्सी कार्य पार पडले. या कॅप्टन्सी कार्यामध्ये बिग बॉसच्या घरातील दोन टीम आमने सामने आल्या होत्या. या कॅप्टन्सी कार्यामध्ये वैभव दुसऱ्या टीममध्ये होता. त्याने आपल्या टीममधील सदस्यांना जिंकून देण्यामध्ये मदत न करता अरबाजच्या टीमसाठी मदत केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif