Aastad Kale-Swapnali Patil Wedding: बिग बॉस मराठी 1 मधील आणखी एक स्पर्धक चढणार बोहल्यावर, लग्नासाठी निवडला प्रेमाचा दिवस!

आस्ताद काळे गेल्या अनेक वर्षांपासून जिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे त्या स्वप्नाली पाटीलशी (Swapnali Patil) लवकरच लग्न करणार आहे. यांच्या लग्नाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या दोघांनी आपल्या लग्नासाठी प्रेमाचा दिवस दिवस निवडला आहे.

Aastad Kale-Swapnali Patil Wedding (Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठी सिझन 1 (Bigg Boss Marathi 1) मधील स्पर्धक शर्मिष्ठा राऊत आणि सई लोकुर नुकत्यात विवाहबंधनात अडकल्या. त्यांच्या पाठोपाठ आता बिग बॉस मराठी मधील आणखी एक स्पर्धक बोहल्यावर चढणार आहेत. त्याचे नाव आहे आस्ताद काळे (Aastad Kale)... या स्पर्धेतील अँग्री यंग मॅन म्हणून प्रसिद्ध असलेला आस्ताद काळे गेल्या अनेक वर्षांपासून जिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे त्या स्वप्नाली पाटीलशी (Swapnali Patil) लवकरच लग्न करणार आहे. यांच्या लग्नाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या दोघांनी आपल्या लग्नासाठी प्रेमाचा दिवस दिवस निवडला आहे. तो म्हणजे 14 फेब्रुवारी (Valentine Day)...

दरम्यान आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांच्या केळवणाला त्यांच्या मित्रपरिवाराने सुरुवात केली आहे. मटाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा धोका लक्षात घेता या जोडीने साग्रसंगीत आणि धुमधडाक्यात विवाह सोहळा न करता कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aastad Sunita Pramod Kale (@aastadkale)

येत्या 14 फेब्रुवारी 2021 रोजी आस्ताद आणि स्वप्नालीचे शुभमंगल सावधान होणार आहे. लग्नाची तारीख त्यांच्या पालकांनीच निवडल्याचे आस्तादने मटाशी बोलताना सांगितले.हेदेखील वाचा- Siddharth Chandekar Mitali Mayekar Wedding: सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर विवाहबद्ध; पहा खास क्षणांचे सुंदर Photos

 

View this post on Instagram

 

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

बिग बॉस मराठी सिझन 1 मध्ये आस्तादने आपल्या स्वप्नालीसोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना हे दोघे कधी लग्न करतायत याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आल्याने चाहत्यांकडून या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आस्ताद आणि स्वप्नाली पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी प्री वेडिंग फोटोशूटही केले होते. त्यानंतर सगळीकडे यांच्या लग्नाची चर्चा होती. आस्ताद आणि स्वप्नाली स्टार प्रवाह वरील 'पुढचं पाऊल' या मालिकेत एकत्र दिसले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement