Zee One आफ्रिका चॅनलवर Marathi serial इंग्रजीत डब करून प्रदर्शित; भाषांतर पाहून नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रीया
जेव्हा एखादा स्थानिक भाषेतील शो इंग्रजी किंवा दुसऱ्या भाषेत डब केला जातो. तेव्हा अनेकदा चुकीचा संवाद निर्माण होण्याची शक्यता असते. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे मराठी मालिका ‘तू तेव्हा तशी’. झी वन आफ्रिका चॅनलवर मालिकेचे इंग्रजीत डबिंग करण्यात आले. त्याचे काही व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.
Marathi serial dubbed in English on Zee One Africa channel : काही अपवाद वगळता बहुतेक लोकांना त्यांचे आवडते शो त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये पाहायला आवडतात. जेव्हा एखादा स्थानिक भाषेतील शो इंग्रजी किंवा दुसऱ्या भाषेत डब केला जातो. तेव्हा अनेकदा चुकीचा संवाद निर्माण होण्याची शक्यता असते. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे मराठी मालिका ‘तू तेव्हा तशी’.नुकतच ZeeOne आफ्रिका चॅनलवर मराठी मालिकेच ‘नेव्हर लेट फॉर लव्ह ’नावाने इंग्रजी डबिंग करून मालिका प्रदर्शित करण्यात आली. त्याचे काही व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. (हेही वाचा: Ashok Saraf Door Name Plate: “धनंजय माने इथेच…” हास्यसम्राट अशोक सराफ यांच्या दारावरची नेमप्लेट चर्चेत; पोस्ट व्हायरल)
मालिकेतील दृश्ये आणि संवाद एकमेकांशी कनेक्ट होत नसल्याचे दिसत आहे. ज्यामुळे गंभीर सीन देखील अनावधानाने इंग्रजीमध्ये मजेदार आहेत. इंग्लिश डायलॉग्स इतके मजेशीर वाटत आहेत की एखाद्याला कानशीलात लगावाना देखील हसणे थांबवता येत नाही अशा प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)