Maha Kumbh 2025: महाकुंभ 2025 दरम्यान बॉलिवूडची माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी अधिकृतरित्या निवृत्त झाली आहे. किन्नर आखाड्यात भव्य पारंपारिक समारंभात त्यांना 'महामंडलेश्वर' हा दर्जा प्रदान करण्यात आला असून यावेळी ममतांनी आपले नवे नाव 'श्री यमाई ममता नंद गिरी' स्वीकारले. मिळालेल्या माहितीनुसार, ममतांनी शुक्रवारी प्रयागराजच्या संगमावर पिंडदानाचा विधी केला, त्यानंतर आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या आशीर्वादाने त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर घोषित करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ममतांनी गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि भगवा पोशाख परिधान केलेला दिसत आहे. यावेळी ती आपल्या सह साधुंसोबत फोटोसाठी पोज देताना दिसली. एका मुलाखतीत ममताने तिच्या आयुष्याचा प्रवास आणि बॉलिवूडमधून ब्रेक घेण्यामागची कारणं सांगितली.
१९९६ मध्ये माझा कल अध्यात्माकडे वळला. गुरु गगन गिरी महाराजांना भेटल्यानंतर माझं लक्ष साधनेकडे गेलं. मी २००० ते २०१२ पर्यंत तपश्चर्या केली आणि १२ वर्षे ब्रह्मचर्य पाळले. या दरम्यान मी दुबईतील एका छोट्या फ्लॅटमध्ये राहिले.
येथे पाहा फोटो:
ममता कुलकर्णी निवृत्त:
मुंबईत परतल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना ममता म्हणाल्या, 'मुंबईत येताना मी भावूक झाले. जिथून मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली ती जागा आठवताना माझ्या डोळ्यात अश्रू होते. महाकुंभ २०२५ मधील ममता कुलकर्णी यांचा हा नवा अध्याय त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचे प्रतिबिंब आहे.