Lockdown 2: लक्ष्मणरेषा ओलांडू नका! रामायणातील सीता उर्फ दीपिका चिखलिया यांची लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विनंती
रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या रामायण (Ramayan) या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील सीतेने (Seeta) म्हणजेच दीपिका चिखलिया (Dipika Chikhalia) यांनी एका खास अंदाजात नागरिकांना घरात राहण्याची विनंती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल देशवासीयांनी संबोधित करताना आपण आता कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी 3 मे पर्यंत वाढवत आहोत अशी घोषणा केली. या निर्णयाला देशातील सर्वपक्षीय राजकीय मंडळी, कलाकार, उद्योगपती अशा सर्वांनी पाठिंबा दर्शवला, तसेच नागरिकांना सुद्धा या लॉक डाऊनचे पालन करून घरात राहण्याचे आवाहन केले. याच पार्श्वभूमीवर रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या रामायण (Ramayan) या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील सीतेने (Seeta) म्हणजेच दीपिका चिखलिया (Dipika Chikhalia) यांनी एका खास अंदाजात नागरिकांना घरात राहण्याची विनंती केली आहे. यासाठी एक व्हिडीओ दीपिका यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करत यात कृपया कोणीही घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका असे सांगितले आहे. Coronavirus: पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली आणि गायक अवधूत गुप्ते यांना देशप्रेमाने गहिवरुन आलं
दीपिका चिखलीया यांनी व्हिडीओ शेअर करताना यामध्ये कोरोनाच्या धोक्यावर सुद्धा भाष्य केले. आपल्या घरातील वृद्ध मंडळींची काळजी घ्या, त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच कोरोना वॉरियर्स म्हणजेच डॉक्टर्स, नर्स, वैसकीय कर्मचारी आणि पोलीस या सर्वांच्या मेहनतीचे दिपीका यांनी कौतुक करून त्यांचे आभार मानले आहेत. Ramayana Characters Memes: रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील 'कुंभकर्ण', 'लक्ष्मण' पात्रावरील मीम्सचा सोशल मीडियात पाऊस!
दीपिका चिखलीया पोस्ट
दरम्यान, लॉक डाऊन काळात सर्वच व्यवसाया बंद असल्याने मालिकांचे चित्रीकरण सुद्धा होऊ शकत नाहीये अशा वेळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन वाहिनेने आपली जुनी रामायण सिरीज पुन्हा प्रदर्शित केली आहे. सुरुवातीपासूनच रामायणाला जबरदस्त टीआरपी मिळत आहे, सोशल मीडियापासून सर्वत्र रामायण आणि महाबहारात या दोन सीरियल्सची चर्चा आहे.