Emergency च्या चर्चेदरम्यान Kangana Ranaut ने विकला तिचा मुंबईतील वादग्रस्त बंगला, किंमत वाचून व्हाल थक्क
यातून तिने 32 कोटींची कमाई केली आहे.
Kangana Ranaut: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) तिचा मुंबईतील पाली हिल येथील वादग्रस्त बंगला विकला आहे. यातून तिला कोटींची कमाई झाली आहे. नर्गिस दत्त रोडवर हा बंगला (Banglow)होता. 2017 साली कंगनाने हा बंगला खरेदी केला होता. आता बक्कळ नफ्यासह तिने बंगला विकला आहे. कंगना ही सध्या तिच्या 'इमर्जन्सी' सिनेमामुळे चर्चेत आहे. तिच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला (Emergency Movie) सेन्सॉर बोर्डाने अद्याप सर्टिफिकेट न दिल्याने ती सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद पहायला मिळत आहे. (हेही वाचा:Kangana Ranaut च्या 'Emergency' साठी निर्माते Bombay HC मध्ये)
बॉलिवूमध्ये अभिनेत्री बनण्याच स्वप्न बाळगूण कंगना मुंबईला आली होती. खडतर प्रवासानंतर आज ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली आहे. त्यामुळे कंगना रणौतचं मुंबई कनेक्शन तिच्या करिअरच्या काळापासूनच आहे. लॉकडाऊन काळात महापालिकेने तिच्या बांद्रा येथील ऑफिसवर कारवाई केली होती. कंगनाचा बांद्रा येथीलच बंगला 3075 स्क्वेअप फुट एरियामध्ये पसरला आहे. 5 सप्टेंबर रोजी तिने बंगला विकला. यासाठी 1.92 कोटी स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरले गेले. कोईम्बतूरच्या श्वेता बथीजा यांनी हा बंगला खरेदी केला आहे. कंगनाने तब्बल 32 कोटी रुपयांना बंगला विकला आहे. म्हणजेच तिला यातून 12 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
कंगना रणौतने भाजपकडून मंडी येथील खासदारीची निवडणूक लढवली होती.ज्यात तिचा मोठा मताधिक्याने विजय झाला. लोकसभा निवडणूकीवेळी तिने आपली संपत्ती एकूण ९१ कोटी असल्याचं दाखवलं होतं. सध्या कंगना सिनेमा आणि राजकारणातही व्यस्त आहे. तिच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.