Isha Keskar Birthday Special: 'बानूबया ते शनाया' या भूमिका साकारताना असा झाला ईशा केसकर हिचा मेकओव्हर (See Photos)
आज तिच्या वाढदिवशी तिच्या करिअरच्या ग्राफ वर आणि यामध्ये झालेल्या तिच्या भन्नाट मेकओव्हरवर एक नजर टाकुयात
जय मल्हार (Jai Malhar) मालिकेतील साधी भोळी बानुबया (Banubaya) इथपासून ते माझ्या नवऱ्याची बायको (Mazya Navryachi Bayko) मधील नखरेल शनाया (Shanaya) या अगदी परस्पर विरोधी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री इशा केसकर (Isha Keskar) हिचा आज वाढदिवस आहे. मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीत आजवर ईशाने अनेक मोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये काम केली आहेत, यामध्ये रायगडाला जेव्हा जाग येते (Raigadala Jevha Jag Yete) नाटकात तिने साकारलेली येसूबाई तसेच मंगलाष्टक वन्स मोअर (Maglashtaka Once More) आणि याला जीवन ऐसे नाव या सारखे चित्रपट यांचा समावेश आहे, पण झी मराठी (Zee Marathi) वरील जय मल्हार या ऐतिहासिक मालिकेनंतरच ईशा खऱ्या अर्थाने घराघरात पोहचली. आज तिच्या वाढदिवशी तिच्या करिअरच्या ग्राफ वर आणि यामध्ये झालेल्या तिच्या भन्नाट मेकओव्हरवर एक नजर टाकुयात..
खंडेरायाची दुसरी पत्नी बानू साकारताना तिच्या साध्याभोळ्या लूकने प्रेक्षकांना भुरळ पाडली, पण आपल्यावर कुठल्याही भूमिकेचा ठपका लागून घेण्याऐवजी ईशाने आपल्या भूमिकांमध्ये प्रयोग करणे निवडले. यामुळेच शनाया या बिनधास्त आणि बोल्ड अवतारात तिने मालिकांमध्ये पुन्हा एंट्री केली. या भूमिकेत रसिका सुनील हिने मिळवलेली प्रसिद्धी पाहता नव्याने प्रेक्षकांसमोर येणे हे मोठे चॅलेंज होते पण ते अगदी तरबेज पणे स्वीकारत तिने आपले वेगळे स्थान तयार केले आहे.
ईशा केसकर इंस्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
Zee Gaurav nomination party 2018! Styled by wonderful @amitastic
A post shared by Isha Chaitanya Keskar (@isha_keskar) on
जय मल्हार नंतर ईशाने पती गेले ग काठेवाडी या नाटकात देखील काम केले होते.
View this post on Instagram
💕one day to go for #patigelegakathyavadi!! Very excited and scared as well🙈Changla hoil na Natak?
A post shared by Isha Chaitanya Keskar (@isha_keskar) on
रसिक सुनील च्या एक्झिट शनाया म्ह्णून ईशा पुन्हा छोट्या पडद्यावर झळकली
दरम्यान, करिअरसोबतच ईशाची लव्हस्टोरी देखील बरीच हिट आहे. काही दिया परदेशी या मालिकेतून समोर आलेल्या शिव म्हणजेच रिशी सक्सेना सोबत इशा रिलेशन मध्ये आहे, ही गोष्ट लपवून न ठेवता त्या दोघांनी सुद्धा अनेकदा उघडपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या रिलेशनविषयी वाच्यता केली आहे.
लेटेस्टली परिवाराकडून ईशाला वाढदिवसासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! Happy Birthday