Isha Ambani च्या विवाहसोहळ्यात बॉलिवूड कलाकर बनले वाढपी, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपली एकुलती एक मुलगी इशा हिचा विवाहसोहळा अँटलिया (Antalia) येथे पार पाडला.
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपली एकुलती एक मुलगी इशा हिचा विवाहसोहळा अँटलिया (Antilia) येथे पार पाडला. यावेळी दिग्गज बॉलिवूड कलाकरांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. तर बॉलिवूड कलाकरांनी इशाच्या लग्नात जेवण वाढतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इशा अंबानीच्या लग्नाला बड्या उद्योगपतींपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनी उपस्थिती लावली होती. तर रात्री जेवणाचा कार्यक्रमसुद्धा ठेवण्यात आला होता. त्यावेळी बिग बी आणि परफेक्शनिस्ट ओळखला जाणारा आमिर खान लग्नातील वऱ्हाडींना जेवण वाढताना दिसून आले.
View this post on Instagram
@amirkingkhan @amitabhbachchan serving at #ishaambani wedding 🙏🏻❤️
A post shared by Thecagestory (@the.cage.story) on
त्यावेळी उपस्थिती लावलेल्या मंडळींना दिग्गज बॉलिवूड कलाकरांनी जेवण वाढल्याने जास्तच जेवण गेले असेल असे म्हटले जात आहे. तर काही नेटकऱ्यांनी या कलाकारांना सोशल मिडियावर ट्रोलही करण्यास सुरुवात केली आहे.