मला आधीपासूनच ठाऊक होतं Cancer आहे; Hrithik Roshan चे वडील Rakesh Roshan यांचा खुलासा

मिड डेला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या गळ्याच्या कॅन्सर (Throat Cancer) विरुद्धच्या लढ्याविषयी बोलत असताना ते म्हणाले की रिपोर्ट येण्याआधीच सप्टेंबर 2018 मध्येच त्यांना कॅन्सरचा संशय आला होता. जिभेच्या खाली त्यांना त्रास होण्यास सुरवात झाली होती. पण फॅमिली डॉक्टरने ही गोष्ट नॉर्मल असल्याचं सांगितलं.

Hrithik Roshan Rakesh Roshan (Photo Credits: Instagram)

आपल्याला झालेल्या कॅन्सर बदल मला आधीपासूनच ठाऊक होतं, असा खुलासा दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी केला आहे. मिड डेला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या गळ्याच्या कॅन्सर (Throat Cancer) विरुद्धच्या लढ्याविषयी बोलत असताना ते म्हणाले की रिपोर्ट येण्याआधीच सप्टेंबर 2018 मध्येच त्यांना कॅन्सरचा संशय आला होता. जिभेच्या खाली त्यांना त्रास होण्यास सुरवात झाली होती. पण फॅमिली डॉक्टरने ही गोष्ट नॉर्मल असल्याचं सांगितलं.

त्यानंतर तीन महिन्यांनी ते जेव्हा एका मित्राला भेटण्यासाठी ते हिंदुजा हॉस्पिटलला गेले असताना ENT स्पेशालिस्टला भेटल्यानंतर त्याने बायोप्सी (Biopsy) करण्याचा सल्ला दिला. 4 दिवसानंतर रिपोर्ट कळणार होते परंतु घरी गेल्या गेल्या त्यांनी कुटुंबातल्या सर्व सदस्यांना सांगून टाकला की माझी पूर्ण खात्री आहे की मला कॅन्सर आहे. जेव्हा डॉक्टरांनी या गोष्टीला दुजोरा दिला तेव्हा त्यांनी जीभ कापून तिथे दुसरी स्किन लावण्याचा उपाय सांगितला आणि रोशन घाबरले. यानंतर अन्य डॉक्टरना दाखवल्या नंतर त्याची गरज नसल्याचे कळले आणि नंतर त्यांनी कॅन्सरचे ऑपेरशन सुद्धा करून घेतले आणि आता ते तंदुरुस्त झाले आहेत.

या वर्षाच्या सुरवातीला जानेवारी महिन्यात ह्रितिक रोशनने (Hrithik Roshan) आपले वडील राकेश रोशन यांना कॅन्सर असल्याचं सांगितलं आणि फॅन्सना धक्का बसला. राकेश रोशन गळ्याच्या कॅन्सरच्या सुरवातीच्या स्टेज मध्ये असल्याचं सांगून त्याने आपल्या वडिलांसाठी चिंता व्यक्त करत त्यांच्या तंदुरुस्तीसाठी दुवा मागण्याचं आवाहन फॅन्सना केलं होतं.