Candyman Star Tony Todd Dies: कँडीमॅन स्टार टोनी टॉड यांचे निधन; वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'कँडीमॅन' मधील भूमिकेसाठी आणि 'स्पायडर-मॅन 2' मधील 'वेनम' चा आवाज म्हणून प्रसिद्ध असलेले टोनी टॉड यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. भयपट आणि आवाजातील अभिनयातील त्यांचा वारसा कायम लक्षात राहील.
प्रसिद्ध अभिनेता टोनी टॉड (Tony Todd) यांचे 6 नोव्हेंबर रोजी त्यांच्या लॉस एंजेलिस येथील निवासस्थानी निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. कँडीमॅनमधील (Candyman Actor) विलक्षण खलनायकाच्या अविस्मरणीय भूमिकेसाठी आणि स्पायडर-मॅन 2 (Spider-Man 2) मधील वेनमचा आवाज म्हणून ते जगभरात ओळखले गेले. त्याशिवायही त्यांची अभिनय आणि मनोरंजन क्षेत्रा मोठी ओळख आहे. टॉडच्य प्रतिनिधीने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली असली तरी त्याचे कारण मात्र स्पष्ट केले नाही. 1954 मध्ये वॉशिंग्टन, D.C. मध्ये जन्मलेल्या आणि कनेक्टिकटमध्ये वाढलेल्या टॉड यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांच्या एकूण कारकीर्दीत त्यांनी भयपटात लक्षणीय योगदान दिले. विशेषतः 1992 च्या कँडीमॅन (Candyman ) या चित्रपटातील त्याच्या प्रतिष्ठित भूमिकेमुळे, ज्याने त्याला न्यूयॉर्क सिटी हॉरर फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळवून दिला.
गेम्सच्या स्पायडर-मॅन 2 मध्ये वेनमला दिला आवाज
अभिनेता टोनी टॉड जवळपास अखेरच्या क्षणांपर्यंत कार्यरत होते. त्यांचा शेवटचा चित्रपट अगदी अलिकडे म्हणजे 2023 मध्ये प्रसिद्ध झाला. ज्यामध्ये इनसोमनियाक गेम्सच्या स्पायडर-मॅन 2 मध्ये वेनमला त्यांनी आवाज दिला. त्यांच्या निधनानंतर, इनसोम्नियाक गेम्सने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आणि म्हटले, "आपला मित्र टोनी टॉड यांच्या निधनामुळे इनसोम्नियाक गेम्सला मोठा धक्का बसला आहे. मार्वलच्या स्पायडर-मॅन 2 च्या निर्मितीदरम्यान त्याने आमच्या स्टुडिओमध्ये आणि त्याच्या अतुलनीय आवाजाने आणि उपस्थितीने जगभरातील अनेक चाहत्यांसाठी खूप आनंद आणला. पण त्यांच्या जाण्याने आम्हाला कायमचे दु:ख झाले". (हेही वाचा, Quincy Jones Passes Away: संगीत निर्माते क्विन्सी जोन्स यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन)
'फायनल डेस्टिनेशनः ब्लडलाइन्स' 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता
टोनी टॉड यांची कारकीर्द 240 हून अधिक स्क्रीन क्रेडिट्ससह पुढची अनेक दशके कायम राहिली. ज्यात प्लाटूनमधील कामगिरी, नाईट ऑफ द लिव्हिंग डेडची 1990 ची पुनर्निर्मिती, द क्रो आणि स्टार ट्रेक आणि फायनल डेस्टिनेशन फ्रँचायझींमधील भूमिकांचा समावेश आहे. 'फायनल डेस्टिनेशनः ब्लडलाइन्स' मधील त्यांची मरणोत्तर भूमिका 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, टॉडचा अद्वितीय आवाज आणि पडद्यावरील शक्तिशाली उपस्थितीने भयपट आणि मुख्य प्रवाहातील चित्रपट या दोन्हींमध्ये आपला कायमस्वरूपी वारसा सोडला आहे. (हेही वाचा, James Earl Jones Passes Away: ज्येष्ठ अभिनेते जेम्स अर्ल जोन्स यांचे वयाच्या 93 वर्षी निधन, न्युयॉर्क येथील राहत्या घरात घेतला अखेरचा श्वास)
टोनी टॉड यांच्याबद्दल थोडक्यात
टोनी टॉड हा एक सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता होता, जो भयपटांमधील त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1954 रोजी वॉशिंग्टन, D.C. येथे झाला आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते भयपट शैलीतील एक मोठे व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी त्यांच्या संस्मरणीय अभिनयाने एक मोठी कारकीर्द मागे सोडली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2024 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

