Priyanka Chopra हिचा आगामी हॉलिवूड सिनेमा 'We Can Be Heroes' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; पहा व्हिडिओ
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. तिचा आगामी हॉलिवूड सिनेमा 'वी कॅन बी हिरोज' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये प्रियंकाचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या हॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. तिचा आगामी हॉलिवूड सिनेमा 'वी कॅन बी हिरोज' (We Can Be Heroes) चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये प्रियंकाचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रियंकाचा वेगळा आणि नवा अंदाज पाहायला मिळत आहे. प्रियंकाने सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडिया माध्यमातून रसिकांच्या भेटीला आणला आहे. हा एक सुपर नॅचरल सिनेमा असून यात Christian Slater, Sung Kang, Pedro Pascal, Boyd Holbrook आणि Haley Reinhart यांच्यासह प्रियंका चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे.
ट्रेलर शेअर करताना प्रियंकाने लिहिले की, "शक्ती सर्व आकारात येते आणि ती ख्रिसमस दिवशी येणार आहे. या अमेझिंग मुलांकडे गुप्त शस्त्र आहे- टीमवर्क. यामुळे सेटवर वेगळीच ऊर्जा होती आणि या सिनेमाचे ते अस्तित्व आहे. दरम्यान, तुम्ही सॅंटाची वाट पाहत असताना बसा आणि हिरो कसा असावा, हे या मुलांना तुम्हाला दाखवू द्या. तुम्ही येताय ना?" (प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी Romantic Photos शेअर करत दिल्या एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा)
प्रियंका चोप्रा ट्विट्स:
Robert Rodriguez यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 2005 मध्ये आलेल्या 'द एडवेंचर्स ऑफ शार्कबॉय एंड लावागर्ल' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. बेवॉच मधील निगेटीव्ह भूमिकेनंतर या सिनेमातही प्रियंका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून सध्या तो ट्रेडिंगमध्ये आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)