Grammy Awards 2019: प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर लेडी गागा 3 पुरस्काराने सन्मानित, 'हे' गाणे ठरले Song Of The Year
तर ग्रॅमी अवॉर्ड (Grammy Awards) हा हॉलिवूड संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक मानला जातो.
Grammy Awards 2019: यंदाच्या 61 व्या ग्रॅमी अवॉर्ड्सचे 11 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. तर ग्रॅमी अवॉर्ड (Grammy Awards) हा हॉलिवूड संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक मानला जातो. या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर लेडी गागा (Lady Gaga) हिला 3 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचसोबत गागा हिचे ग्रॅमी 2019 पुरस्कार सोहळ्यात 'This is America' हे गाणे सॉंन्ग ऑफ द इयर ठरले आहे. एलीसिया कीज हिने या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर पुरस्कार द रेकॉर्डिंग अॅकेडमी यांच्यातर्फे देण्यात आले.
पुरस्कार विजेते आणि नॉमिनेशच्या लिस्टमधील लेडी गागा हिचे दिस इज अमेरिका हे गाणे सर्वश्रेष्ठ ठरले आहे. त्याचसोबत गागा हिची गाणी Where Do You Think You Are Goin'? बेस्ट पॉप सोलो परफॉर्मेंस कॅटेगरीमध्ये निवडली गेली. गागा हिच्या सर्वश्रेष्ठ गाण्यासह अजून पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये ब्रेडली कूपर यांच्यासह शॅलो सॉंन्गसाठी बेस्ट ड्युओ परफॉर्मेंस आणि रेकॉर्ड ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला आहे.
दिस इज अमेरिका हे गाणे डोनाल्ड ग्लोवर याने गायले असून चाइल्डिश गॅंबिनो यांनी लिहिले आहे. तर विविध माध्यमातील पुरस्कारांबाबात बोलायचे झाले तर इतर कलाकारांना सुद्धा अशाच प्रकारच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे:
BEST POP SOLO PERFORMANCE: जॉन (व्हेयर डू यु थिंक यू आर गोइंग) लेडी गागा
BEST POP VOCAL ALBUM: स्वीटनर या अल्बमसाठी एरियाना ग्रेनेड
BEST TRADITIONAL POP VOCAL ALBUM: माय वे अल्बमसाठी विली नील्सन को
BEST RAP SONG: गॉड्स प्लान या रॅप सॉंन्गसाठी ड्रेक ह्याला सन्मानित करण्यात आले आहे.