विज्ञानानुसार Bella Hadid ठरली पृथ्वीवरील सर्वात सुंदर महिला; ग्रीक सौंदर्याच्या व्याख्येनुसार Perfect Face चे उत्तम उदाहरण (Photos)

या मोजमापाचे प्रमाण स्वतः शास्त्रज्ञांकडे आहे, म्हणजेच विज्ञानाने सौंदर्य कसे असावे किंवा कोणाला सुंदर म्हणावे याची स्वतःची व्याख्या ठरवली आहे. विज्ञानाच्या या मापदंडानुसार नुकतीच या पृस्ठीवरील सर्वात सुंदर महिलेची निवड करण्यात आली आहे

Bella Hadid (Photo Credit Instagram)

असे म्हणतात की सौंदर्याचे कोणतेही प्रमाण नसते, सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. परंतु जेव्हा शारीरिक सौंदर्याचा विचार केला जातो, तेव्हा सौंदर्याचे काही मापदंड समोर येतात ज्यामुळे सौंदर्य मोजले जाऊ शकते. या मोजमापाचे प्रमाण स्वतः शास्त्रज्ञांकडे आहे, म्हणजेच विज्ञानाने सौंदर्य कसे असावे किंवा कोणाला सुंदर म्हणावे याची स्वतःची व्याख्या ठरवली आहे. विज्ञानाच्या या मापदंडानुसार नुकतीच या पृथ्वीवरील सर्वात सुंदर महिलेची निवड करण्यात आली आहे. या व्याख्येनुसार जगातील सर्वात सुंदर महिला होणाचा मान मिळवला आहे हॉलिवूडची सुपरमॉडेल बेला हदीद (Bella Hadid) हिने.

 

View this post on Instagram

 

New Dior♥️ @diormakeup by two of the greatest @peterphilipsmakeup @richardburbridge Love

A post shared by (@bellahadid) on

 

View this post on Instagram

 

Yellow sky bathed in light

A post shared by (@bellahadid) on

2013 पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या बेलाला याआधी अनेकवेळा ‘मॉडेल ऑफ द इयर’ हा किताब मिळाला आहे. मात्र आता विज्ञानानेही मान्य केले आहे की, 23 वर्षीय सुपरमॉडेल बेला हदीद ही जगातील सर्वात सुंदर महिला आहे. म्हणजेच सायन्सच्या मते बेलाचा चेहरा जगातील ‘Perfect Face’ आहे. शारीरिक सौंदर्याच्या, म्हणजेच Golden Ratio of Beauty Phi च्या मानकांवर आधारित हा निष्कर्ष आहे. याद्वारे 23 वर्षीय बेला हदीदचा चेहरा हा मानकाशी 94.35% मिळता जुळता आहे. बेलाचे डोळे, भुवया, नाक, ओठ, हनुवटी, जबडे आणि चेहऱ्याचा आकार मोजला असता, तो प्राचीन ग्रीकांच्या मते जी सौंदर्याची व्याख्या होती त्याच्या अगदी जवळ आहे. बेलाला तिच्या हनुवटीसाठी तब्बल 99.7% गुण मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

@derekblasberg is trying to convince me to make a YouTube channel should I do it y/n

A post shared by (@bellahadid) on

 

View this post on Instagram

 

Me n Hugo. My Fckin idol @hugocomte @thepopmag

A post shared by  (@bellahadid) on

या मानकांमध्ये बेला नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे 38 वर्षीय गायिका बियॉन्से, जिचा चेहरा 92.44% सुंदर आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे 26-वर्षीय अभिनेत्री अंबर हर्ड (Amber Heard), जिचा चेहरा 91.85% सुंदर आहे.  कॉस्मेटिक सर्जन डॉ. ज्युलियन डी सिल्व्हा यांनी नवीन संगणकीकृत मॅपिंग तंत्र वापरुन हे निष्कर्ष काढले आहेत. बेलाच्या या यशामध्ये तिच्या नैसर्गिक सुंदरतेचे प्रमाण फार कमी आहे. करण याआधी तिच्यावर ओठ, हनुवटी, नाक. गाल यांची प्लास्टिक सर्जरी केल्याचे आरोप लागले आहेत.