Actor Ravi Patwardhan Passes Away: ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड; वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

भारदस्त व्यक्तिमत्व, या व्यक्तमत्वाला शोभणाऱ्या झुपकेदार मिशा, भारदस्त आवाज, विविध विषयांचा व्यासंग, वाचन आणि सहकलाकारांसोबत असलेले मैत्र ही रवी पटवर्धन ( (Actor Ravi Patwardhan) यांच्या व्यक्तिमत्वाची खास ओळख हो

Ravi Patwardhan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन (Actor Ravi Patwardhan Passes Away) झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. आपल्या दमदार अभिनयामुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. 'अग्गबाई सासूबाई' ( Agga Bai Sasubai) या टीव्ही मालिकेत अभिनय करताना ते छोट्या पडद्यावर शेवटचे दिसले. याशिवाय अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या भूमीक लोकप्रिय ठरल्या. भारदस्त व्यक्तिमत्व, या व्यक्तमत्वाला शोभणाऱ्या झुपकेदार मिशा, भारदस्त आवाज, विविध विषयांचा व्यासंग, वाचन आणि सहकलाकारांसोबत असलेले मैत्र ही रवी पटवर्धन ( (Actor Ravi Patwardhan) यांच्या व्यक्तिमत्वाची खास ओळख होती.

रवी पटवर्धन यांनी केवळ चित्रपट नव्हे तर अनेक नाटकांमधून अभिनय केला. खरे तर रवी पटवर्धन हे पहिल्यांदा नाट्यअभिनेते होते. त्यानंतर ते चित्रपट अभिनेते होते. अनेक चित्रपटांतून त्यांनी गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या भूमिका साकारल्या. काही चित्रपटांमध्ये त्यांनी वडील किंवा भाऊ अशाही भूमिका साकारल्या. त्यांनी जवळपास 150 पेक्षा अधिक नाटकं आणि जवळपास 200 चित्रपटांतून भूमिका साकारल्या.

रवी पटवर्धन यांची गाजलेली नाटके

रवी पटवर्धन यांनी अपराध मीच केला, आनंद (बाबू मोशाय), आरण्यक (धृतराष्ट्र), एकच प्याला (सुधाकर), कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान), कोंडी (मेयर) कौंतेय, जबरदस्त (पोलीस कमिशनर), तुघलक (बर्नी), तुझे आहे तुजपाशी (काकाजी)

तुफानाला घर हवंय (आप्पासाहेब, बापू), पूर्ण सत्य, प्रपंच करावा नेटका, प्रेमकहाणी (मुकुंदा), बेकेट (बेकेट), भाऊबंदकी, मला काही सांगायचंय (बाप्पाजी), मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस), विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर), विषवृक्षाची छाया (गुरुनाथ), वीज म्हणाली धरतीला, शापित (रिटायर्ड कर्नल), शिवपुत्र संभाजी (औरंगजेब), सहा रंगांचे धनुष्य (शेख), सुंदर मी होणार (महाराज), स्वगत (एकपात्री प्रयोग, जयप्रकाश नारायण), हृदयस्वामिनी (मुकुंद) यांसारख्या अनेक नाटकांतून भूमिका साकारल्या. त्यांनी एकच प्याला, तुफानाला घर हवंय या नाटकांची निर्मितीही केली. (हेही वाचा, Avinash Kharshikar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे ठाणे येथे निधन, वयाच्या 68 व्या वर्षी एक्झिट)

रवी पटवर्धन यांचा अभिनय असलेले चित्रपट

अंकुश (हिंदी), अशा असाव्या सुना, उंबरठा, दयानिधी संत भगवान बाबा, ज्योतिबा फुले, झॉंझर (हिंदी), तक्षक (हिंदी), तेजाब (हिंदी), नरसिंह (हिंदी), प्रतिघात (हिंदी), बिनकामाचा नवरा, सिंहासन, हमला (हिंदी), हरी ओम विठ्ठला

टीव्ही मालिका आणि कार्यक्रम

अग्गंबाई सासूबाई झी मराठी मालिका, आमची माती आमची माणसं, तेरा पन्‍ने (तेरा भागांची हिंदी मालिका, मुख्य भूमिका हेमा मालिनी), महाश्वेता (हिंदी मालिका, तत्त्वनिष्ट व ध्येयनिष्ठ शिक्षक), लाल गुलाबाची भेट (मराठी नाटक, लेखक : रत्‍नाकर मतकरी)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now