Sambhaji Jayanti 2020: रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू ते राजसंन्यास छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर बेतलेली मराठी रंगभूमी वरील बहुचर्चित नाटकं!
मग पहा संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित कोणकोणती लोकप्रिय नाटकं मराठी रंगभूमीवर आली होती.
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती! आज 14 मे दिवशी जगभरात या हिंदवी स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात आहे. दरवर्षी शिवाप्रेमी मोठ्या उत्साहाने शंभुराजेंची जयंती साजरी करतात. पण यंदा मात्र या सोहळ्याला धामधूम सेलिब्रेशन नसेल. कडक संचारबंदी महाराष्ट्रात लागू असल्याने लॉकडाऊनमध्ये घरात अडकून पडलेल्या अनेकांकडे सध्या वेळच वेळ आहे. मग आज संभाजी महाराज जयंती निमित्त त्यांचा जीवनप्रवास दर्जेदार कलाकृतींमधून पहायचा असेल तर अनेक मराठी साहित्यिकांनी संभाजी महाराजांच्य आयुष्यावर काही मराठी नाटकं देखील रंगभूमीवर आणली होती. आज संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अगदी घरबसल्या तुम्ही काही नाटकांचा आस्वाद घेऊ शकता. वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांना रसिकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मग पहा संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित कोणकोणती लोकप्रिय नाटकं मराठी रंगभूमीवर आली होती. Sambhaji Maharaj Jayanti 2020 Wishes: संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा मराठी संदेश, SMS, Messages, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp द्वारा शेअर करून साजरा करा छत्रपती शंभुराजेंचा जन्मसोहळा!
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित नाटकं
इथे ओशाळला मृत्यू
वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकामध्ये काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर अशा दमदार कलाकारांची फळी होती. संभाजी राजेंचे हाल हाल करून औरंगजेबाने घडवून आणलेला त्यांचा मृत्यू या मनाला हेलावून टाकणार्या घटनेवर हे नाटक आधारित आहे. नक्की वाचा: Sambhaji Maharaj Jayanti 2020: संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या मराठा साम्राज्याच्या दुसर्या छत्रपतींंविषयी खास गोष्टी!
रायगडाला जेव्हा जाग येते
रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक देखील वसंत कानेटकर यांनीच लिहले आहे. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज महाराज यांच्यामधील कौटुंबिक कलह आणि ते सावरण्यासाठी सुरू असलेली धडपड नाट्यमयरित्या रंगवली आहे. सुरूवातीला काशिनाथ घाणेकरांनी या नाटकामध्ये काम केले होते. पुढे नव्या कलाकारांसोबत पुन्हा पुन्हा त्याचे प्रयोग सादर झाले आहेत.
राजसंन्यास
रा. ग. गडकरी यांनी संभाजी राजेंच्या आयुष्यावर 'राजसंन्यास' हे नाटक लिहलं होतं. या नाटकामध्ये संभाजी राजेंबद्दल केलेल्या काही विधानांवरून समाजातील काही लोकांनी त्यावर आक्षेप देखील घेतला आहे. ‘राजसंन्यास’नाटकामध्ये संभाजी राजेदेखील, राजसंन्यासाचे मर्म शिकण्यासाठी कर्तृत्ववान वडिलांचा आधार न घेता, काही दु:खांना सामोरे जात स्वत:ची मते तयार करतात, असे दाखवण्याचा प्रयत्न या नाटकात दाखवण्याचा प्रयत्न आहे.
बेबंदशाही
बेबंदशाही हे वि.ह. औंधकर लिखित मराठी नाटकं संभाजी राजेंच्या आयुष्यावर बेतलेलं आहे. आज हे पुस्तक रूपात वाचण्यासाठी अनेक ठिकाणी उपलब्ध आहे.
संगीत छत्रपती संभाजी
छत्रपती संभाजी यांच्या आयुष्यावर जशी पुस्तक रूपी आणि गद्य स्वरूपातील नाटकं रंगभूमीवर आली तशीच संगीत छत्रपती संभाजी ने शंभुराजेंचा इतिहास रसिकांसमोर मांडला आहे. आत्माराम मोरेश्वर पाठारे यांचं हे नाटक आहे.
Sambhaji Jayanti 2020 Wishes: संभाजी महाराज जयंती च्या शुभेच्छा देणारे मराठी Wishes, HD Greetings - Watch Video
नाटकांप्रमाणेच मालिकांमधूनही संभाजी राजेंच्या जीवनावर प्रकाश टाकणार्या काही कलाकृती रसिकांसमोर आल्या आहेत. मराठा साम्राज्याचा पसारा वाढवण्यासाठी संभाजी महाराजांनी घेतलेल्या परिश्रमांचा, त्यांनी दिलेल्या संयमेचा, धैर्याचा वसा आज पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायचा असेल तर त्यांच्या आयुष्यातील या दरजेदार साहित्यालाही आपण पुढील पिढीसमोर ठेवणं गरजेचे आहे.