प्रेमानंद गज्वी ठरले 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष
कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांच्याकडून प्रेमानंद गज्वी पदभार स्वीकारणार आहेत.
Akhil Bhartiy Marathi Natya Sanmelan : 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या नव्या अध्यक्षांची आज घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी (Premanand Gajvee) हे 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष असतील. कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांच्याकडून प्रेमानंद गज्वी पदभार स्वीकारणार आहेत. श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर यांच्यावर मात करून लेखक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी (Premanand Gajvee) यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडण हे प्रेमानंद गज्वी यांच्या लेखनाचं खास वैशिष्ट्य आहे. साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेने वि.वा. शिरवाडकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
यंदाच्या नाट्य संमेलनाचे ठिकाण अजून जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच त्याचादेखील घोषणा केली जाणार आहे. नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल.