Kirti Shiledar Passes Away: मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री, गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन

कीर्ती शिलेदार यांनी मराठी संगीत रंगभूमीवर एकच प्याला मध्ये 'सिंधू', मानापमान नाटकात 'भामिनी', संशयकल्लोळ मध्ये रेवती या भूमिका साकरल्या होत्या.

Kirti Shiledar | PC: Instagram

मराठी संगीत रंगभूमीवरील गायिका,अभिनेत्री कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचं निधन झाले आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कीर्ती शिलेदार वयाच्या दहाव्या वर्षी मराठी रंगभूमीवर आल्या. त्यानंतर आपल्या अभिनयाने आणि गायनाने जगभरात ठसा उमटवला आहे. कीर्ती शिलेदार या जयराम आणि जयमाला शिलेदार या अभिनेत्या दांपत्याच्या त्या कन्या होत्या. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी मोलाचं योगदान दिले आहे. 2018 मध्ये त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

मुरलीधर मोहोळ ट्वीट

आई वडीलांच्या मार्गदर्शनासोबतच शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण कीर्ती शिलेदार यांनी नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे घेतले होते. पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेची पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी नाटकांचे 400 पेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. एकच प्याला मध्ये 'सिंधू', मानापमान नाटकात 'भामिनी', संशयकल्लोळ मध्ये रेवती या भूमिका त्यांनी साकरल्या होत्या. हे देखील नक्की वाचा: Pandit Birju Maharaj Passes Away: प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  .

कीर्ती शिलेदार यांना 2014 सालचा महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. आज त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif