Priyanka Nick Reception Party : 'पिंगा' गाण्यावर नृत्य करून दीपिका आणि प्रियंकाने दिला आठवणींना उजाळा (Video)

रिसेप्शन पार्टीमध्ये प्रियंका आणि दीपिकाने त्यांच्याच पिंगा गाण्यावर नृत्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले

दीपिका आणि प्रियंका (संग्रहित - संपादित प्रतिमा)

देसीगर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas)च्या लग्नाला तब्बल 20 दिवस झाले तरी, या जोडप्याचा कौतुक सोहळा काही संपत नाही. अगदी मोजक्या लोकांच्या सानिध्यात यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर यांच्या रिसेप्शन पार्ट्यांना सुरुवात झाली. प्रियंकाने (20 डिसेंबर) मुंबईमध्ये बॉलीवूडमधील काही मोजक्याच लोकांसाठी एका जंगी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यातीलच एक जोडपे होते दीपिका आणि रणवीर. दोन आघाडीच्या नवपरिणीत नायिका एकत्र आल्याचा योग चक्क पिंगा गाण्यावर नृत्य करून साजरा केला गेला. होय या रिसेप्शन पार्टीमध्ये प्रियंका आणि दीपिकाने त्यांच्याच पिंगा गाण्यावर नृत्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

दोन दिग्गज नायीकांमधून विस्तवही जात नाही असे म्हणतात, मात्र याला अपवाद दीपिका आणि प्रियंका. बाजीराव-मस्तानी चित्रपटात या दोघी एकत्र आल्या होत्या. या चित्रपटातील पिंगा हे गीत आणि नृत्य फारच लोकप्रिय ठरले होते. आता लग्नानंतर जेव्हा या दोघी एकत्र आल्या तेव्हा त्यांनी याच गीतावर नृत्य करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी रणवीरही अतिशय उत्साहाने दोघींना साथ देताना दिसत आला, यातूनच या तिघांची केमिस्ट्री दिसून येते.

मुंबईमध्ये या रिसेप्शनचा सोहळा पार पडला. याआधीच्या पार्टीत प्रियंकाने सब्यसाचीनिर्मित निळ्या रंगाचा अनारकलीत परिधान केला होता. या ड्रेसमुळे सर्वांच्याच नजरा प्रियंकावर खिळल्या होत्या. या ड्रेसच्या मेकिंगचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे. तर कालच्या पार्टीत प्रियंकाने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी तयार केलेला पांढऱ्या रंगाचा टूपीस घातला होता.

 

View this post on Instagram

 

The making of Priyanka Chopra’s lehenga and jewellery for her wedding reception in Mumbai. @priyankachopra Video Courtesy: Sabyasachi #Sabyasachi #PriyankaChopra #NickYanka #SabyasachiJewelry @sabyasachijewelry #TheCuriosityArtandAntiquityProject #CAAP #TheWorldOfSabyasachi

A post shared by Sabyasachi Mukherjee (@sabyasachiofficial) on

या पार्टीत सलमान खान, कतरिना कैफ, स्वरा भास्कर, परिणिती चोप्रा, राजकुमार राव आणि गर्लफ्रेंड पत्रलेखा, करन जोहर, बॉबी देओल, अनुष्का शर्मा, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, तमन्ना भाटिया, सुभाष घई, मधुर भंडारकर, ए. आर. रहमान, कंगना राणावत, जितेंद्र, तुषार कपूर, हेमा मालिनी, संजय दत्त, कार्तिक आर्यन, भूमी पेडनेकर, शबाना आझमी, काजोल, आशा भोसले असे अनेक मान्यवर उपस्थित होते. आता हे कपल हनिमूनला स्वित्झर्लंडला जाणार आहे.