Zaira Wasim Father Passes Away: दंगल फेम झायरा वसीमला पितृशोक; 'तुमच्या प्रार्थनेत त्यांना लक्षात ठेवा', म्हणत इन्स्टाग्रावर भावुक पोस्ट शेअर
मंगळवारी तिच्या वडिलांचे निधन झाले. झायराने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
Zaira Wasim Father Passes Away: 'दंगल' फेम अभिनेत्री झायरा वसीमला (Zaira Wasim) पितृशोक झाला आहे. मंगळवारी तिच्या वडिलांचे निधन झाले. झायराने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. झायराने ही माहिती शेअर करत वडिलांसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यावर तिने 'माझे वडील जाहिद वसीम यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांना तुमच्या प्रार्थनेत कायम लक्षात ठेवा. अल्लाह त्यांच्या सर्व चुका माफ करेन. त्यांना सर्व दुःखापासून वाचव. त्यांचा पुढचा प्रवास सोपा करेल. त्यांना लवकर बोलावले आहे. त्यांना जन्नतमध्ये सर्वोच्च जागा दिली जाईल. आपण सर्वजण अल्लाहचेच आहोत', असं कॅप्शन तिने लिहलं आहे. (हेही वाचा:Locusts Attack: 'दंगल' अभिनेत्री झायरा वसीमने टोळधाडीच्या हल्ल्याला म्हटले अल्लाचा कहर, यूजर्सचा संताप पाहून ट्विट केले डिलीट)
झायरा खानने दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दंगलमध्ये तिने आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. दंगलनंतर तिने काही चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र, तिने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता.
झायराबद्दल बोलायचे झाले तर, तिने 'दंगल' (Dangal)चित्रपटात गीता फोगट यांची लहानपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने टद स्काय इज पिंक (The Sky Is Pink), 'सिक्रेट सुपरस्टार' (Secret Superstar) या चित्रपटात काम केले होते. झायराने सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.