City Of Dreams मध्ये प्रिया बापट चा बोल्ड अंदाज, Lesbian Kissing Scene वरून ट्रोल करणाऱ्यांना प्रियाने दिले चोख उत्तर
City Of Dreams मधून दमदार भूमिका साकारत अभिनेत्री प्रिया बापट हिने डिजिटल स्क्रीनवर पदार्पण केले आहे. या सीरिज मध्ये प्रियाचा बोल्ड अंदाज व लेस्बियन किसिंगचा सीन पाहून सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये वेगळीच चुळबुळ ऐकायला येत आहे.
निवडणुकांच्या निमित्ताने कुटुंबातच होणारी खुर्चीची भांडणं मांडणारी वेब सिरीज (Web Series) 'सिटी ऑफ ड्रीम्स'(City Of Dreams) 3 मे ला हॉटस्टार (Hotsatar) वर प्रदर्शित करण्यात आली. या हॉटस्टार स्पेशल वेबसीरिज मध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) , प्रिया बापट (Priya Bapat) , सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) , सचिन पिळगावकर (sachin Pilgaonkar) यांसारखी मराठी कलाकार मंडळी एकत्र पाहायला मिळत आहेत. राजकीय थरारावर भाष्य करणाऱ्या या सीरीजवर अनेक ठिकाणहून कौतुकाचा वर्षाव होत असताना काही चाहत्यांमध्ये वेगळ्याच विषयावर चर्चा रंगताना पाहायला मिळतायत.
या मध्ये प्रमुख भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिचा बोल्ड अंदाज बघून चाहते चांगलेच चक्रावून गेलेत.मधील एका सीन् मध्ये प्रिया बापट आपली सह कलाकार गीतिका त्यागी (Geetika Tyagi) हिला किस करताना दिसत आहे, यावरून अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.
याबाबत एका मुलाखतीत बोलताना प्रिया सांगते की, माझ्यासाठी हे ट्रोल्स काही नवीन नाहीत, याआधीही माझ्या कपड्यांवरून लोकांनी अनावश्यक टिपण्या केल्या होत्या त्यामुळे आता मला याचा काहीही फरक पडत नाही, शिवाय जर तुम्ही ही सीरिज पूर्ण पाहिलीत तर तुम्हाला त्या सीनचा संदर्भ व महत्त्व आपसूकच समजेल.माझ्यासाठी काम करणं महत्वाचं आहे त्या कामात जर अशा सीन्सची मागणी असेल तर त्या सीन ची गरज, दिग्दर्शकाचा दृष्टीकोन,लेखकाचा विचार, व त्यामुळे कथेत पडणारा फरक या सगळ्यांचा विचार मी करते, त्यामुळेच हा सीन तुम्हाला वेबसिरीज मध्ये पाह्यला मिळत आहे.
प्रिया बापट या सीरिजमध्ये एका राजकीय नेत्याच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे, वडिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर निवडणूक कोण लढवणार यावरून दोन भावंडांची शर्यत यामध्ये दाखवण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागेश कुकुनूर यांनी या सीरिजचे दिगदर्शन केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)