'छत्रपती शिवाजी महाराजां'चा उल्लेख फक्त 'शिवाजी' असा केल्यामुळे Kaun Banega Crorepati आणि Sony TV वर होत आहे बहिष्काराची मागणी

तो इतका विकोपाला गेलाय की आता केबीसी आणि सोनी (Sony TV) वर बहिष्कार टाकायची मागणी होत आहे.

Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram, File Photo)

सोनी वाहिनी आणि वाद या दोन गोष्टी काही आता वेगळ्या राहिलेल्या नाहीत. मग तो कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा वाद असो किंवा अनु मलिक वरील लैंगिक शोषणाचे आरोप असोत गेली काही वर्ष सोनी वाहिनी काही ना काही कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडतेच आहे. आता मात्र या वादाचं कारण भलताच शो ठरला आहे. सध्या चालू असलेला आणि अत्यंत लोकप्रिय असा 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) च्या 11 व्या पर्वा मुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तो इतका विकोपाला गेलाय की आता केबीसी आणि सोनी (Sony TV) वर बहिष्कार टाकायची मागणी होत आहे.

केबीसीच्या प्रसारित झालेल्या परवाच्या भागामध्ये एका स्पर्धकाला विचारण्यात आलेला प्रश्न होता,'खालीलपैकी कोणते राज्यकर्ते मुघल सम्राट औरंगजेब याला समकालीन होते?' आणि त्यावर दिलेले पर्याय होते महाराणा प्रताप, राणा संग, महाराजा रणजीत सिंग आणि शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज्यांचा उल्लेख फक्त शिवाजी असा केला गेल्यामुळे अनेक जणांनी निषेध सुरु केला. यामध्ये फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरील जनतेनेही यावर निषेध व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर ट्विटर वर 'बॉयकॉट केबीसी सोनीटीव्ही' या हॅशटॅग खाली मोहीमही सुरु केली गेली आहे. (हेही वाचा. Anu Malik यांची Indian Idol मधून पुन्हा हकालपट्टी होण्याची शक्यता; वाचा सविस्तर)

पाहूया काही ट्विट्स:

 

 

 

आता हा वाद कोणतं वळण घेतो आणि समस्त महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दुखावलेल्या या भावनांवर सोनी आता काय पावलं उचलते हे आता पुढचं भवितव्य ठरवू शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif