Ustad Zakir Hussain Admitted To US Hospital: जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रकृती चिंताजनक; अमेरिकेच्या रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, उस्ताद झाकीर हुसैन हे सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका रुग्णालयात गंभीर प्रकृतीच्या कारणास्तव दाखल आहेत, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Ustad Zakir Hussain (फोटो सौजन्य - X/@pervaizalam)

Ustad Zakir Hussain Admitted To US Hospital: जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन (Ustad Zakir Hussain) यांना प्रकृतीच्या त्रासामुळे रविवारी सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हुसेन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. झाकीर हुसैन हे संगीत जगतातील एक मोठे नाव असून त्यांचे वडील अल्ला रखा हे देखील प्रसिद्ध तबला वादक होते. मिळालेल्या माहितीनुसार, उस्ताद झाकीर हुसैन हे सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका रुग्णालयात गंभीर प्रकृतीच्या कारणास्तव दाखल आहेत, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

झाकीर हुसेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला त्यांच्या मेहुण्याने दुजोरा दिला आहे. बीबीसीचे पत्रकार परवेझ आलम यांनी आपल्या ताज्या ट्विटमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. परवेझ आलम यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांचा फोटो ट्विट करत झाकीर लवकर बरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा -Subhash Ghai Health Update: चित्रपट निर्माते सुभाष घई मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल, ICU मध्ये उपचार सुरु)

उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 1951 मध्ये मुंबईत झाला. ते जगातील महान तबला वादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित केले आहे.