मुंबई: गीतकार साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातील साहित्य भंगार दुकानात सापडले

या रोजनिशीमध्ये साहिर यांनी दिवसभराचा कार्यक्रम लिहिला आहे. ज्यात कोणाला भेटायचे आहे. कोणत्या स्टुडीओत ध्वनिमुद्रण आहे. कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे. तसेच, घटनास्थळावर सूचलेल्या काही कविता, शेर आदींचे मुखडेही आणि व्यक्तिगत आयुष्यातील तपशीलही यात मोठ्या प्रमाणावर सापडतात

Sahir Ludhianvi | (File Photo)

जगप्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकर साहिर लुधियानवी (Sahir Ludhianvi) यांचे नाव घेतल्याशिवाय बॉलिवुडचा इतिहासच लिहिला जाणार नाही. अशा या प्रतिभावंत कलाकाराचा अनमोल असा साहित्य ठेवा चक्क मुंबईतील एका भंगाराच्या दुकानात सापडला आहे. या साहित्यात साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरात असलेली पत्रं, रोजनिशी, कविता आणि कृष्णधवल छायाचित्रे (Sahir Ludhianvi Photo) आदी गोष्टींचा समावेश आहे. एका संस्थेने साहिर यांचा हा ठेवा खरेदी केला असून, ही संस्था हा ठेवा जतन करुन ठेवणार आहे. विशेष म्हणजे या संस्थे साहिर यांचा शब्दरत्नांचा हा ठेवा अवघे तीन हजार रुपयांतच मिळाला आहे.

साहिर यांचा नव्याने सापडलेले साहित्य जतन करुन ठेवण्यासाठी ते विकत घेणाऱ्या संस्थेचे नाव ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’ (Film Heritage Foundation Mumbai) असे आहे. ही संस्था मुंबईस्थित असून, ती ना नफा ना तोटा या तत्वावर काम करते. मुंबईतील जुहू या ठिकाणी एक भंगाराचे दुकान आहे. या दुकानात वर्तमानपत्रं आणि अनेक मासिकांचे ठिगच्या ढिक होते. या ढिगाऱ्यातच साहिर यांची शब्दरत्ने या संस्थेस गवसली. या साहित्याचे जतन करुन भविष्यात ती प्रसिद्ध करण्याचा या संस्थेचा मानस, असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

नेमके काय आहे 'त्या' साहित्यात?

भंगाराच्या दुकानात सापडलेल्या साहिर यांच्या साहित्यामध्ये रोजनिशी आहे. या रोजनिशीमध्ये साहिर यांनी दिवसभराचा कार्यक्रम लिहिला आहे. ज्यात कोणाला भेटायचे आहे. कोणत्या स्टुडीओत ध्वनिमुद्रण आहे. कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे. तसेच, घटनास्थळावर सूचलेल्या काही कविता, शेर आदींचे मुखडेही आणि व्यक्तिगत आयुष्यातील तपशीलही यात मोठ्या प्रमाणावर सापडतात. यातील बहुतांश नोंदी या ‘परछाईयाँ' प्रकाशनगृहाशी संबंधीत असल्याचे फिल्म हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक-संचालक शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (हेही वाचा, अमृता प्रीतम यांचा 100वा स्मृतिदिन Google Doodle, पंजाबी भाषेतील या लोकप्रिय कवयत्रीबद्दल घ्या जाणून)

साहिर लुधियानवी थोडक्यात माहिती

साहिर लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी साहिर असे होते. त्यांचा जन्म 8 मार्च 1921 मध्ये लुधियाना येथील जाहागीरदार कुटुंबात झाला. साहिर यांचे कुटुंब श्रीमंत होते. परंतू, काही कारणामुळे साहिर यांच्या आईवडीलांचा काडीमोड झाला. त्यामुळे साहिर हे आईसोबत वडिलांपासून विभक्त झाले.साहिर यांचे शिक्षन लुधियाना येथील खालसा हायस्कूलमध्ये झाले. सन 1939 मध्ये ते जेव्हा सरकारी महाविद्यालयात शिकत होते तेव्हा त्यांचे आणि पंजाबी कवयत्री अमृता प्रितम यांच्याशी प्रेमसंबंध जुळले. महाविद्यालयीन जीवनात साहिर हे कविता आणि शेरोशायरीसाठी प्रसिद्ध होते. अमृता प्रितम यांच्यासोबतचे प्रेमसंबंध अमृताच्या घरच्यांना मुळीच आवडले नाहीत. अमृताच्या वडीलांनी महाविद्यालयात तक्रार केली. या तक्रारीवरुन साहिर यांना महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. त्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी अनेक नोकऱ्या केल्या. पुढे ते बॉलिवुडमध्ये गीतकार म्हणून प्रसिद्ध पावले.