सुप्रसिद्ध गायक Ajay-Atul यांना अग्निपथ मधील 'या' लोकप्रिय गाण्यासाठी मिळाला दशकातील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा Mirchi Music Award

त्यांच्या टीमने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

Ajay Atul (Photo Credits: Facebook)

हिंदी संगीतामध्ये मानाचा समजला जाणारा मिर्ची म्युजिक पुरस्कार (Mirchi Music Awards) सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अशी एक खास गोष्ट घडली जे ऐकून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येईल. मराठीपाठोपाठ बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध संगीतकार-गायकांची जोडी अजय-अतुल यांना अग्निपथमधील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा तसेच सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या टीमने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

ऋतिक रोशन आणि प्रियंका चोपड़ा यांची प्रमुख भूमिका असलेला 'अग्निपथ' हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचबरोबर यातील गाणीही तुफान गाजली. त्यातील 'अभी मुझमें कहीं' या गाण्याला मिर्ची म्युजिक चा दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच या याच गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून अजय-अतुल यांना पुरस्कार मिळाला.हेदेखील वाचा- Radhe Poster Out: प्रतिक्षा संपली! सलमान खान च्या 'राधे' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज

ही बातमी त्यांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर करून या पुरस्कार सोहळ्याचे आणि तमाम चाहत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर या गाण्याचे गायक सोनू निगम, गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे देखील अभिनंदन केले.

अग्निपथ या चित्रपटात ऋतिक आणि त्याच्या बहिणीवर हे गाणे चित्रित करण्यात आले. या गाण्याचा शब्दांना ऋतिक रोशनने आपल्या अभिनयातून पुरेपूर न्याय दिला. हे गाणे आजही अनेकजण गुणगुणताना दिसतात. त्यावरून तब्बल दहा वर्षानंतर हा पुरस्कार मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असेही अजय-अतुल यांनी सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif