#MeToo प्रकरणातून दिग्दर्शक विकास बहल याची निर्दोष मुक्तता, 'सुपर 30' सिनेमासाठी दिलं जाणार दिग्दर्शनाचं श्रेय

दिग्दर्शक विकास बहल याच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाची पडताळणी झाल्यावर रिलायन्स एंटरटेनमेंट च्या अंतर्गत कमिटीने त्याला निर्दोष जाहीर केले आहे.

विकास बहल (Photo Credits: Facebook)

'Queen' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक विकास बहाल (vikas bahel) याच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी फँटम फिल्म्स (Phantom Films) या निर्मात्या कंपनीतील एका महिलेने विकासने  अत्याचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ह्रितिक रोशन (Hritik Roshan)  याने निर्मात्यांना विनंती करून सुपर 30 (Super 30) सिनेमातुन देखील विकासाला बाहेरचा रस्ता दाखवला होता मात्र आता या आरोपाची पडताळणी करणाऱ्या रिलायन्सच्या (Reliance Entertainment) अंतर्गत समितीने विकासाला क्लीन चीट दिल्याचे समजत आहे. त्यामुळे विकास याने आता सुपर 30 सिनेमात पुन्हा एकदा दिग्दर्शनाचे श्रेय प्राप्त केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विकास वरील आरोपांची पडताळणी करण्यासाठी रिलायन्सच्या अंतर्गत एक कमिटी तयार करण्यात आली होती. या कमिटीतर्फे विकास वर आरोप करणाऱ्या महिलेला वारंवार चौकशी साठी येण्याची विनंती केली जात होती मात्र ही महिला सतत काही ना काही कारण सांगून ही चौकशी टाळत होती. त्यामुळे विकासाच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याने त्याला निर्दोष म्हणून घोषित करण्यात आले याबरोबरच त्याची सुपर 30 मध्ये एंट्री देखील निश्चित करण्यात आल्याचे रिलायन्स एंटरटेनमेंट चे सीईओ शिवाशिष सरकार यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी कंगना रनौत हिने देखील विकास वर छेडछाड केल्याचा आरोप केला होता. #MeToo मध्ये सई ताम्हणकरची उडी, आलोक नाथ नरकात सडेल ! तीव्र शब्दात प्रतिक्रिया

विकास वर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या दोघांनीही विकास त्याच्याशी असलेले आर्थिक संबंध तोडले होते.तसेच विकासाचा जवळचा मित्र ह्रितिक याने देखील त्याच्या विरोधात निर्मात्यांना विनंती केली होती मात्र आता क्लीन चिट मिळाल्यावर हे संबंध पुर्वव्रत होणार का याविषयी संशय आहे. तसेच आतापर्यंत ज्या कलाकारणावर मी टू च्या ट्रेंड अंतर्गत आरोप लावण्यात आले त्यांच्यापैकी अनेकांची निर्दोष म्हणून मुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे या आरोपांमागील तथ्य व हेतू यावर नेटकाऱ्यानी प्रश्न उभारायला सुरवात केली आहे.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना