Sherni Trailer: विद्या बालन स्टारर 'शेरनी' चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित, नक्की पाहा

टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या मस्ट वॉच प्रकारातील नाट्याचे दिग्दर्शन समीक्षकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या न्यूटन’फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर याने केले आहे.

Sherni Trailer (Photo Credits: YouTube)

अमेझॉन प्राईम (Amazon Prime) व्हिडीओद्वारे बहुप्रतीक्षित हिंदी सिनेमा शेरनीचा धमाकेदार ट्रेलर (Sherni Trailer) आज प्रदर्शित झाला आहे. जगातील 240 हून अधिक देशांमध्ये 18 जून रोजी प्रदर्शित होणार असून त्याच्या ट्रेलरचे प्रकाशन आज करण्यात आले. या सिनेमात विद्या बालन (Vidya Balan) प्रमुख भूमिकेत असून एका करारी वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत झळकणार आहे. टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या मस्ट वॉच प्रकारातील नाट्याचे दिग्दर्शन समीक्षकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या न्यूटन’फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर याने केले आहे.

सिनेमाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो.हेदेखील वाचा- Jagame Thandhiram Trailer मधील अभिनेता Dhanush च्या लूकला चाहत्यांची पसंती, पाहा ट्रेलर

या सिनेमात विद्या बालनसह शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असतील.

ट्रेलर लॉन्चप्रसंगी स्वत:चा उत्साह व्यक्त करताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, “मी पहिल्यांदा शेरनी’चे कथानक ऐकले आणि ते मला भावले. मी व्यक्तिरेखेत शिरले. मी साकारत असलेली सिनेमातील विद्या काही शब्दांत समजावून घेता येईल. मात्र व्यक्तिरेखेचे अनेक पैलू आहेत. या सिनेमाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. आदर, परस्परांना समजून घेणे आणि सह-अस्तित्वाच्या धाग्यांनी गुंतलेले आहे. ते केवळ मानव-पशू द्वंद नसून माणसा-माणसातील नात्यांवर भाष्य करणारे आहे. ही अभिनव व्यक्तिरेखा साकारताना मला फारच आनंद झाला. अमेझॉन प्राईम व्हिडियोच्या माध्यमातून हे कथानक जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना अनपेक्षित मार्गांनी गुंतवून ठेवेल ही आशा बाळगते.”