Vicky Kaushal Birthday: बालपणीच्या गोड फोटोंसह खास पोस्ट करत सनी कौशल याने विक्की कौशल याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

इतकंच नाही तर सनीने विक्कीसाठी छानशी पोस्टही लिहिली आहे.

Vicky Kaushal and Sunny Kaushal (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा हॉट अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) याचा आज 32 वा वाढदिवस. 'राज़ी,' 'उरी,' 'संजू,' 'लस्ट स्टोरीज,' 'मसन' यांसारख्या सिनेमातून विक्कीने बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. सिनेमाची निवड, अभिनय यामुळे तो प्रेक्षकांना भावला. तर हॉट, हॅंडसम व्यक्तिमत्त्वाने विक्कीचा चाहतावर्ग नक्कीच वाढला. आज या हॅंडसम हँकच्या वाढदिवसानिमित्त त्याचा भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) याने बालपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. इतकंच नाही तर सनीने विक्कीसाठी छानशी पोस्टही लिहिली आहे. सनी कौशल देखील अभिनेता असून त्याने 'गोल्ड' आणि 'भंगड़ा पा ले' या सिनेमांमध्ये काम केले आहे.

"काही बदलले नाही.. फक्त फोटो पेपर वरुन फोनमध्ये आला. काही बदलले नाही... तू 2 फूट 6 इंचावरुन 6 फूट 2 इंच झालास. बाकी काहीही बदलले नाही... आपण आधीपण कूल होतो आणि आतापण खूप कूल आहोत... बाकी काहीही बदलले नाही... मी डाव्या बाजूला तू उजव्या बाजूला होतास.. बघ काहीही बदललेले नाही... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा.." अशी सुंदर पोस्ट करत सनी कौशलने विक्की कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Vicky Kaushal Birthday Special: अभिनयासोबतच Looks मध्ये सुद्धा भल्याभल्यांना मागे टाकेल अशा विक्की कौशल चे 'हे 10' फोटो आहेत खूपच हॉट)

Sunny Kaushal Post:

 

View this post on Instagram

 

कुछ नहीं बदला... Photo paper से phone-पर आ गयी, बाक़ी कुछ नहीं बदला... तू 2 फीट 6 से 6 फीट 2 का हो गया, बाक़ी कुछ नहीं बदला... हम पहले cool थे आज very cool हैं, बाक़ी कुछ नहीं बदला... मैं left था, तू right है। देख, कुछ नहीं बदला... जन्मदिन मुबारक हो brother @vickykaushal09 , ढेर सारा प्यार ❤️

A post shared by Sunny Kaushal (@sunsunnykhez) on

विक्की वेगवेगळ्या भूमिका अगदी सहजरित्या करु शकतो, हे त्याच्या कामातून सिद्ध झाले आहे. त्याच्या कामातील एकरुपता आणि सहजता प्रेक्षकांना अधिक भावते. 2021 मध्ये विक्कीचा Sardar Udham Singh हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशाच नवनव्या सिनेमातून विक्की कौशल सदैव आपले मनोरंजन करत राहो, याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!