‘Border 2’: 'बॉर्डर 2' चित्रपटात वरुण धवनची धमाकेदार एन्ट्री, सनी देओल करणार दिग्दर्शन
या चित्रपटाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये अभिनेता वरुण धनण यांचा आवाज ऐकू येत आहे.
‘Border 2’: सनी देओल यांचा 'बॉर्डर 2' चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये अभिनेता वरुण धनण यांचा आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे चित्रपटात वरुण धवनची धमाकेदार एन्ट्री होणार असल्याचे दिसत आहे. सनी देओल यांची सोशल मीडियावर 'बॉर्डर 2' च्या सिक्वेलची घोषणा केली. बॉर्डर हा चित्रपट 1997 च्या वेळी प्रदर्शित झाला. (हेही वाचा- हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' ने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा केला पार, श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम)
मिळालेल्या माहितीनुसार, बॉर्डर 2 च्या घोषणे पासून चाहत्यांना चित्रपटात कोण झळकणार याची उत्सुकता लागली आहे. चित्रपटात आता वरुण धवन झळकणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत वरुणचा आवाज ऐकू येत आहे. त्या व्हिडिओत त्यांनी असं म्हटले आहे की, मला “ दुष्मन की हर गोली से, 'जय हिंद' बोल के तकराता हूं. जब धरती मा बोलाती है तब सब छोड कर लौट आता हूॅं' पोस्टमध्य त्यांनी हा चित्रपट केव्हा रिलीज होईल याची माहिती दिली आहे.
बॉर्डर २ मध्ये वरुण धवनची एन्ट्री
हा चित्रपट प्रजासत्ताक दिनादरम्यान 23 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट देशभक्तीपर असणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात सनी देओल, सिद्धार्थ चतुर्वेदी, वेदांत रैना आणि आदित्य रॉय कपुर झळकणार आहे. तर सनी देओल अनुराग सिंग यांच्यासह दिग्दर्शन करणार आहे.