Makar Sankranti 2021: Urmila Matondkar च्या पैठणीतील मराठमोळ्या अंदाजात संक्रांतीच्या शुभेच्छा, म्हणाली तिळगुळ घ्या, गोडगोड बोला !

बॉलिवूडची रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हीने आज ट्वीटरच्या माध्यमातून तिळ गूळ घ्या गोड गोड बोला म्हणत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा (Makar Sankranti) दिल्या आहेत.

Urmila Matondkar | Photo Credits: Twitter/ Urmila Matondkar

बॉलिवूडची रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हीने आज ट्वीटरच्या माध्यमातून तिळ गूळ घ्या गोड गोड बोला म्हणत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा (Makar Sankranti) दिल्या आहेत. संक्रांती निमित्त ट्वीट करताना महाराष्ट्राचं पारंपारिक वस्त्र समजल्या जाणार्‍या पैठणीतील एक खास अंदाज त्यांनी पोस्ट केला आहे. चिंतामणी रंगातील ब्रोकेड काठातील पैठणीमध्ये उर्मिलाचा असाल मराठमोळा अंदाज पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. Makar Sankranti 2021 निमित्त अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांसह 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी शेअर केले ब्लॅक साडी लूक!

दरम्यान काही महिन्यांपासून उर्मिला आणि कंगना रनौत या अभिनेत्रींमध्ये ट्वीटर वॉर पहायला मिळालं आहे. उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेवर पाठवलेल्या 12 जणांच्या राज्यपाल नियुक्त लोकांमध्ये आहे. दरम्यान त्याला अद्याप महाराष्ट्राचे गव्हर्नर भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला मंजुरी दिलेली नाही पण शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी कामाला सुरूवात केली आहे. Makar Sankranti 2021 Wishes in Marathi: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी SMS, Quotes, WhatsApp Stickers द्वारा शेअर करून द्विगुणित करा आनंद.

काही दिवसांपूर्वीच पश्चिम उपनगरामध्ये उर्मिला मातोंडकर यांनी 4 कोटीचा व्यवहार करत नवं ऑफिस देखील थाटलं आहे. त्यावरूनही राजकीय क्षेत्रात आणो सोशल मीडियामध्ये मोठी चर्चा झाल्याचं पहायला मिळालं आहे. उर्मिला मागील काही दिवस सोशल मीडियामध्ये चांगल्याच अ‍ॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळाल्या आहेत. त्यांच्यावर होणार्‍या आरोपांचा आणि विरोधकांचा त्यांनी खरपूस भाषेत समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं आहे. आज सोशल मीडियात ट्वीट करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक राजकीय मंडळी, कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif