Upcoming Indian Web Series of 2020: कोरोना विषाणूच्या काळात लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहेत Mirzapur 2, Tandav, A Suitable Boy यांसारख्या अनेक वेबसिरीज; पहा यादी
अशा परिस्थितीत सुरक्षेचा उपाय म्हणून देशातील थिएटर बंद आहेत. यामुळेच सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची (OTT Platform) चलती आहे.
सध्या देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संकट दिवसेंदिवस गदग होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेचा उपाय म्हणून देशातील थिएटर बंद आहेत. यामुळेच सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची (OTT Platform) चलती आहे. आजकाल नेटफ्लिक्स पासून वूट पर्यंत अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म लोकांचे मनोरंजन करीत आहेत. दरम्यान, आता सणासुदीचा हंगामही येत आहे, म्हणूनच की काय सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बरेच शो आणि वेब मालिका रिलीजसाठी सज्ज आहेत. यातील काही सिरीज या नव्या आहेत तर काही सिरीज त्यांचा दुसरा सिझन घेऊन येत आहेत. यामध्ये मिर्झापूर 2, तांडव, ए सुटेबल बॉय, अशा काही लोकप्रिय सिरीजचा समावेश आहे.
तर आज आपण अशा अपकमिंग वेबसिरीजची यादी पाहणार आहोत.
मिर्झापूर 2 (Mirzapur 2) -
अखेर मिर्झापूर 2 हा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या अभिनयाने या सिझन सजलेला असणार आहे. ही सिरीज 23 ऑक्टोबर रोजी Amazon Prime वर प्रसारित होईल.
क्रॅकडाउन (Crackdown) -
ही सिरीज एक डिटेक्टिव्ह थ्रीलर आहे, ज्याद्वारे दिग्दर्शक अपूर्व लखिया डिजिटल डेब्यू करणार आहे. यामध्ये साकीब सलीम, इक्बाल खान, श्रिया पिळगावकर, वलुचा डी सुसा, राजेश तैलंग आणि अंकुर भाटिया हे मुख्य कलाकार आहेत. 23 सप्टेंबर रोजी व्हूट सिलेक्टवर ही मालिका प्रदर्शित होईल.
तांडव (Tandav) -
सेक्रेड गेम्सच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात पदार्पण करणारा सैफ आता दिग्दर्शक अली अब्बास जफरचा शो तांडवद्वारे पुनरागमन करीत आहे. ही सिरीज भारतीय राजकारणाच्या गडद बाजूवर आधारित आहे. या शोमध्ये सुनील ग्रोव्हर, मोहम्मद झीशान अयूब आणि सारा जेन डायस आहेत. Amazon Prime वर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. याच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
द फॅमिली मॅन 2 (The Family Man Season 2) -
मनोज बाजपेयी याच्या लोकप्रिय मालिकेचा या दुसरा सिझन आहे. यामध्ये दाक्षिणात्य स्टार सामंथा अक्किनेनी दिसणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘द फॅमिली मॅन’ चा सीझन 2 प्रदर्शित होणार असून, अद्याप याच्या अधिकृत प्रदर्षांची तारीख जाहीर केलेली नाही.
स्कॅम 1992 हर्षद मेहता ची कहाणी (Scam 1992 the Harshad Mehta Story)-
चित्रपट निर्माता हंसल मेहता यांची ही मालिका भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याची कहाणी सांगणार आहे. ही सिरीज देबाशिष बसू आणि सुचेता दलाल यांच्या 'द स्कॅम' या पुस्तकावर आधारित आहे. ही सिरीज सोनी लाइव्हवर प्रदर्शित होणार आहे.
ए सुटेबल बॉय (A Suitable Boy) -
मीरा नायर यांनी विक्रम सेठ यांच्या 'ए सुटेबल बॉय' या कादंबरीवर या सिरीज तयार केली आहे. यामध्ये तब्बू, ईशान खट्टर आणि नवोदित तान्या माणिकताला यांच्या भूमिका आहेत. या मालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे. आता लवकरच ही सिरीज भारतीय प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. (हेही वाचा: अक्षय कुमार ने शेअर केला लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचा टीझर, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा (Watch Video))
बॉम्बे बेगम (Bombay Begums) -
बॉम्बे बेगमचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव आणि बोर्निला चटर्जी यांनी केले आहे. यात पूजा भट्ट, शहाना गोस्वामी, अमृता सुभाष, प्लाबिता बोर्थाकूर आणि आराध्या आनंद यांच्या भूमिका आहेत. नेटफ्लिक्सवर ही सिरीज रिलीज होणार असून, त्याची अद्याप तारीख जाहीर झाली नाही.
तर अशा प्रकारे या काही महत्वाच्या वेबसिरीज आहे ज्या प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.