Yearender 2020: या वर्षात 'या' 5 गाण्यांनी जिंकल प्रेक्षकांच मन; कोटींमध्ये मिळाले आहेत व्यूज
यातील काही गाण्यांना काही कोटींमध्ये व्यूज मिळाले आहेत.
2020 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी (Film Industry) काही खास नव्हते. कोरोना विषाणूमुळे (COVID-19) बहुतेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. मात्र, अशातदेखील अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लॉकडाऊन काळात या गाण्यांनी लोकांची मोठी करमणूक केली. त्यामुळे या गाण्यांना YouTube वर लाखो व्यूज मिळाले आहेत. या वर्षात बादशाह असो किंवा नेहा कक्कड़ या सर्व गायकांची गाणी लोकांना प्रचंड आवडली. 2020 हे वर्ष संपण्यासाठी अत्यंत कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. या वर्षात लोकांनी काही गाण्यांना प्रचंड पसंती दर्शवली. यातील पाच गाण्यांना यूट्यूबवर काही कोटींमध्ये व्यूज मिळाले आहेत. (हेही वाचा - Antim- The Final Truth: सलमान खान सोबत Fight करतानाचा आयुष शर्मा चा व्हिडिओ आला समोर; पहा ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’ चित्रपटाचा टीझर)
गेंदा फूल -
गायक बादशहा यांचं गाणं बादशाह आणि जॅकलिन फर्नांडिज यांच्या गेंदा फूल या गाण्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याला यूट्यूबवर 680 दशलक्षाहून अधिक दृश्ये मिळाले आहेत. यावरून या गाण्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. तथापि, या गाण्याच्या बोलावरून काही वाद झाले होते. मात्र, त्यानंतर बादशाहने त्याच्या लेखकाला 5 लाख रुपये दिले.
लगदी लाहौर दी -
स्ट्रीट डांसर थ्रीडी या चित्रपटात गुरु रंधावाच्या 'लगदी लाहौर दी' या गाण्याने लोकांचे खूप मनोरंजन केले. वरुण धवन आणि श्रद्धा कपूरच्या या चित्रपटातील गाणं अत्यंत लोकप्रिय ठरलं.
तारो के शहर -
नेहा कक्कर आणि झुबीन नौटियाल यांचे तारो के शहर हे रोमँटिक गाणेही चांगलेचं गाजले. या गाण्यात नेहा कक्कडचा भाऊ सनी कौशल दिसला होता. लोकांना हे गाणे खूप आवडले. हे गाणे युट्यूबवर 28 कोटीहून अधिक लोकांनी पाहिले होते.
गर्मी -
वरुण धवन आणि श्रद्धा कपूरच्या 'स्ट्रीट डान्सर 3 डी' ची सर्व गाणी खूप गाजली आहेत. त्यातील एक गाणं म्हणजे गर्मी. हे गाणं बादशाह आणि नेहा कक्कड़ यांनी गायलं आहे. यूट्यूबवर या गाण्याला 341 दशलक्षाहून अधिक दृश्ये मिळाली आहेत.
दिल बेचारा -
प्रेक्षकांना सुशांतसिंग राजपूतचा दिल बेचारचा टायटल ट्रॅक चांगलाचं आवडला. सुशांतच्या मृत्यूने सर्वांना हादरवून सोडलं. अशा परिस्थितीत प्रेक्षकांनी त्याच्या चित्रपटावर प्रेम दाखवलं. एआर रहमान यांनी या चित्रपटात संगीत दिले आहे. या गाण्याला यूट्यूबवर 100 दशलक्षाहून अधिक दृश्ये मिळाली आहेत.