Alia Bhatt Photos: कानात झुमके, कपाळावर बिंदी लावून आलिया भट्टने चाहत्यांना लावले वेड, पांढऱ्या साडीतील 'हे' फोटोज सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल
प्रमोशनचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. विशेष म्हणजे आलिया पांढऱ्या साडीत गंगूबाईचे प्रमोशन करत आहे.
Alia Bhatt Photos: आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीच्या (Gangubai Kathiawadi) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. गंगूबाई काठियावाडीचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी केले आहे. आलिया साडीतचं चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.
गंगूबाई काठियावाडीच्या प्रमोशनमुळे आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्रमोशनचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. विशेष म्हणजे आलिया पांढऱ्या साडीत गंगूबाईचे प्रमोशन करत आहे. आलियाने आज पुन्हा एकदा पांढऱ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. आलियाच्या पांढऱ्या रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट आहे. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. कानातले आणि केसात पांढरे गुलाब लावून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (वाचा - Lock Upp Teaser: कंगना रिअॅलिटी शो 'लॉक अप'मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण)
फोटोंमध्ये आलिया वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. आलियाने सूर्यप्रकाशात ही छायाचित्रे क्लिक केली आहेत. या पोस्टला तिने गुलाबी फूल, व्हाइट हार्ट आणि सूर्याचे इमोजी पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे.
आलिया चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. नुकताच तिच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरनेही ट्रेलरचे वेगळ्या पद्धतीने कौतुक केले आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर आलियासोबत यात अजय देवगण आणि विजय राज हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.