Diwali 2022: यंदा अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानच्या घरी दिवाळी पार्टी होणार नाही; काय आहे कारण? जाणून घ्या

यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन मोठे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) या दिवाळी पार्टीसाठी कोणतीही तयारी करणार नाहीत. त्यामुळे यावेळी खान आणि बच्चन यांच्या घरी दिवाळीची पार्टी होणार नाही. तर अभिनेता अक्षय कुमारने दिवाळीसाठी खास प्लॅन केला आहे.

Diwali 2022: यंदा अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानच्या घरी दिवाळी पार्टी होणार नाही; काय आहे कारण? जाणून घ्या
Amitabh Bachchan, Shahrukh Khan (PC - Facebook)

Diwali 2022: दिवाळी सणाला अगदी काही दिवस बाकी आहेत. दिवाळी (Diwali 2022) या पवित्र सणाचा उत्सव चित्रपट जगतातही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. दरवर्षी बहुतेक सिनेतारकांनी दिवाळीच्या फराळाचे आयोजन केल्याचे पाहायला मिळते. पण बातम्यांवर विश्वास ठेवला तर, यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन मोठे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) या दिवाळी पार्टीसाठी कोणतीही तयारी करणार नाहीत. त्यामुळे यावेळी खान आणि बच्चन यांच्या घरी दिवाळीची पार्टी होणार नाही. तर अभिनेता अक्षय कुमारने दिवाळीसाठी खास प्लॅन केला आहे.

दरवर्षी सुपरस्टार शाहरुख खानच्या घरी दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यादरम्यान, बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व तारे या दोन कलाकारांच्या घरी दिवाळीच्या पार्टीत सहभागी होतात. पण यावेळी तसे होणार नाही आणि त्यामागचे कारण कोरोना आहे. (हेही वाचा - Bhediya Trailer Out: वरुण धवन आणि क्रिती सेनॉनच्या 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Watch Video)

वास्तविक, अमिताभ बच्चन काही वेळापूर्वी कोविड 19 मधून बरे झाले आहेत, अशा परिस्थितीत, इंडिया टुडेच्या बातमीनुसार, यावर्षी ते कोणत्याही प्रकारचे सभा किंवा जास्त लोक असलेल्या कोणत्याही कार्यक्रमाचे तसेच पार्टीचे आयोजन करणार नाहीत. त्याचवेळी, मिळालेल्या माहितीनुसार, कोविडमुळेचं यंदा मन्नतवर दिवाळी पार्टी होणार नाहीये. बिग बी आणि शाहरुख व्यतिरिक्त चित्रपट निर्माता करण जोहर देखील यावेळी दिवाळी बॅश पार्टी आयोजित करत नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सुपरस्टार अक्षय कुमार यावेळी त्याच्या घरी दिवाळी 2022 साजरी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, दिवाळी पार्टीसाठी अक्षयच्या घरी 20 लोकांची पार्टी आयोजित केली जाऊ शकते. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता अक्षयलाही जास्त धोका पत्करायचा नाही. यापूर्वी बॉलीवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्स कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, रकुल प्रीत, हुमा कुरेशी, राजकुमार राव आणि करण जोहर सहभागी झाले होते.

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2022 01:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).