Diwali 2020: बिग बी पाठोपाठ यंदा जितेंद्र कपूर यांच्या घरी देखील होणार नाही दिवाळीचे सेलिब्रेशन, तुषार कपूर ने सांगितले यामागचे कारण
याचे कारण त्यांचा मुलगा अभिनेता तुषार कपूर (Tushar Kapoor) याने सांगितले आहे. जितेंद्र कपूर यांचे खूप जवळच्या मित्राचे निधन झाल्याने यंदा कपूर परिवारात दिवाळीचे जश्न होणार नाही.
यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) देशावर आर्थिक संकट ओढावले आहे. दरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे लागत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी मोठमोठ्या समारंभावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे यंदा बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरी दिवाळीनिमित्त असणा-या भव्या पार्टीचे आयोजन होणार नाहीय. त्यापाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर (Jitendra Kapoor) यांच्या घरी देखील दिवाळीचे सेलिब्रेशन होणार नाही. याचे कारण त्यांचा मुलगा अभिनेता तुषार कपूर (Tushar Kapoor) याने सांगितले आहे. जितेंद्र कपूर यांचे खूप जवळच्या मित्राचे निधन झाल्याने यंदा कपूर परिवारात दिवाळीचे जश्न होणार नाही.
जितेंद्र कपूरची ही जवळची व्यक्ती आहे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor). ऋषि कपूर हे जितेंद्र कपूर यांचे स्नेही होती. त्यांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने जितेंद्र यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसला. त्यामुळे वडिल जितेंद्र कपूर यांची यंदा दिवाळी साजरी करण्याची इच्छा नाही आहे असे तुषार कपूर याने सांगितले आहे. हेदेखील वाचा- Diwali 2020: बच्चन कुटुंबिय यंदा दिवाळी पार्टीचं आयोजन करणार नाहीत; अभिषेक बच्चन ने सांगितलं 'हे' कारण
मिड डे सोबत बोलताना तुषार ने ही माहिती दिली असून यंदा ते दिवाळी साजरी करणार नाही असे सांगितले आहे. आमचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तेथे माझ्या मुलाची सुट्टी सुरु आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत घालवणार आहे असेही तुषार म्हणाला.
कपूर परिवासरासह यंदा अनेक सेलिब्रिटीजच्या घरात दिवाळीची दरवर्षीप्रमाणे दिसणारी धामधूम होणार नाही आहे. अगदी साधेपणाने हे सेलिब्रेटीज दिवाळी साजरा करणार आहेत.