Tanhaji: The Unsung Warrior Meta Review- अजय देवगण चा तान्हाजी नक्की आहे तरी कसा?

परंतु, त्याआधी जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल थोडक्यात.

Ajay Devgn in Tanhaji The Unsung Warrior (Photo Credits: Twitter)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर मावळ्याची शौर्य कथा म्हणजे तान्हाजी: द अनसंग वॉरिअर. हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. तसेच या चित्रपटाला स्पर्धा देत आहे दीपिका पदुकोण हिचा छपाक हा सिनेमा. परंतु, 'तान्हाजी' हा चित्रपट नक्की कसा आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. परंतु, त्याआधी जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल थोडक्यात.

हा एक ऍक्शनपट असून मराठ्यांचा इतिहास यातून दाखवण्यात आला आहे. अभिनेता अजय देवगण चित्रपटात प्रमुख म्हणजेच तान्हाजी यांच्या भूमिकेत दिसत आहे. तर त्याची रिअल लाईफ पार्टनर म्हणजेच काजोल ही चित्रपटात देखील त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ती सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसत आहे. सैफ अली खान हा निगेटिव्ह रोलमध्ये दिसतो. चला तर बघूया या चित्रपटाचा मेटा रिव्ह्यू.

Times of India

'तन्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटातील विविध गुणांची नोंद टाइम्स ऑफ इंडियाने केली आहे- उत्कृष्ट कामगिरी, सामर्थ्यवान कृती, व्हिज्युअल इफेक्ट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतिहासाच्या पृष्ठांवरील एक कथा उलगडते.

Pinkvilla

तन्हाजी या चित्रपटाची कथा सुरवातीला फारच हळू वाटते. परंतु दुसरा भाग तितकाच कणखर वाटतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा आउटस्टँडिंग क्लायमॅक्स आहे जो आपल्याला टाळ्या वाजवण्यास भाग पाडतो... पिंकविल्लाने तन्हाजीला चार स्टार दिले आहेत. तसेच "तन्हाजी एक व्हिजुअल ट्रीट आहे आणि स्वराज्यापेक्षा काहीच जास्त नाही असा विश्वास ठेवणार्‍या योध्याच्या जीवनाचे दर्शन घडवते."

Hindustan Times

तन्हाजी हा चित्रपट उत्तम कलाकृतीने परिपूर्ण आहे तसेच त्यात वापरण्यात आलेल्या स्पेशल इफेक्टसमुळे पात्रांचा प्रभाव कमी होतो. आपल्याला कलाकार काय करत आहेत यावर लक्ष केंद्रित करायचे असले तरीही आपल्याला चित्रपटातील व्हीएफएक्स आणि 3 डी इफेक्ट विचलित करणारे आहेत.

Maharashtra Times

महाराष्ट्र टाइम्सने या चित्रपटाविषयी लिहिले आहे, "अजय देवगणचा ‘तान्हाजी’ नरवीर तानाजी मालुसरेंचं शौर्य ताकदीने मांडतो. त्यात काही गोष्टी ‘मिसिंग’ वाटतात. काही वेळा कथा-पटकथेवर तंत्रज्ञान प्रभावी ठरत नाही ना, असंही वाटून जातं. ओम राऊतचा हा पहिला हिंदी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहायला हवा. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी कोणत्या अग्निदिव्यातून गेले त्याची प्रचिती सिनेमा देतो."



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif