सैफ अली खान याच्या Live Interview मध्ये अचानक आलेल्या तैमूर याने विचारला प्रश्न; पहा व्हिडिओ

असेच काहीसे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या सोबत घडले आहे. सैफ अली खान लाईव्ह व्हिडिओद्वारे मुलाखत देत असताना अचानक तैमूर समोर आला आणि प्रश्न विचारु लागला.

Saif Ali Khan and Taimur (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांशी कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियाचा मार्ग निवडला आहे. सोशल मीडिया पोस्ट, फोटोज, व्हिडिओज आणि लाईव्ह चॅट याद्वारे अनेक सेलिब्रिटी यांनी चाहत्यांशी संपर्कात आहेत. लाईव्ह व्हिडिओ म्हटल्यावर अनेकदा फोटोबॉम्बिंगला (Photobombing) सामोरे जावे लागू शकते. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्या सोबत घडले आहे. सैफ अली खान लाईव्ह व्हिडिओद्वारे मुलाखत देत असताना अचानक तैमूर (Taimur) समोर आला आणि प्रश्न विचारु लागला. (करीना कपूर खान आणि मुलगा तैमूर चा 'Baby Shark do do' गाण्यावरील क्युट डान्स सोशल मिडियावर व्हायरल, Watch Video)

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सैफ अली खान लाईव्ह व्हिडिओद्वारे बोलत असताना अचानक तैमूर समोर येतो आणि काही विचारु लागतो. तो काय विचारतो हे तुम्हा-आम्हाला कळण्याच प्रश्नच येत नाही. कारण तैमूरला काय म्हणायचे आहे ते खुद्द सैलला देखील कळत नाही. मात्र त्यानंतर सैफची रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

نام او تیمور علی خان است😍 از عادت های او میتوان به آمدن وسط مصاحبه های پدرش اشاره کرد😁😍 مثل اینکه یکی داره با گوشی با سیف مصاحبه میکنه،تیمورم صفحه گوشی رو میبینه و فکر میکنه عکساشون قاطی شده😂😂 #saifalikhanfan #سیف_علی_خان #saifalikhanpataudi #سیف_علیخان #saifalikhanfans #سیف_علیخان_فن #saifalikhan #سیفعلی_خان #saifalıkhan #سیف #taimuralikhan #تیمورعلی_خان #taimuralikhanpataudi #بالیوود #bollywood

A post shared by سیف علی خان (@saifalikhan__iranianfp2) on

सैल अली खानचे दोन सिनेमे अलिकडच्या काळात प्रदर्शित झाले. 'जवानी जानेमन' आणि 'तानाजी.' जवानी जानेमन सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नसला तरी तानाजी सिनेमा मात्र सुपरहिट ठरला. हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला असून यात सैफने उदयभान राठोड ही भूमिका साकारली होती.