Dil Bechara Title Track: सुशांत सिंह राजपूत याच्या 'दिल बेचारा' सिनेमाचे पहिले गाणे रसिकांच्या भेटीला! (Watch Video)
सुशांत सिंह राजपूत आणि संजना संघी यांचा 'दिल बेचारा' सिनेमातील पहिले सॉन्ग आज रिलीज करण्यात आले. युट्युबवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला लोकप्रिय संगीतकार ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे
Dil Bechara Title Song Video: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि संजना संघी (Sanjana Sanghi) यांच्या 'दिल बेचारा' (Dil Bechara) सिनेमातील पहिले गाणे आज रिलीज करण्यात आले. युट्युबवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला लोकप्रिय संगीतकार ए.आर. रहमान (A.R. Rahman) यांनी संगीतबद्ध केले आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. या गाण्यात आपल्याला सुशांतचा हटके डान्स पाहायला मिळत आहे. हे गाणे अत्यंत प्रेमाने बनवले असून यातून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला यातून श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे संगीतकार ए.आर. रहमान यांनी सांगितले.
'दिल बेचारा फ्रेंड जोन का मारा' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे खुद्द ए.आर, रहमान यांनी गायले आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांच्या लेखणीतून हे गाणे अवतरले आहेत. या गाण्यात सुशांत-संजना यांचा मजेशीर डान्स पाहायला मिळत आहे. गाणे रिलिज होताच याला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. गाण्यातील सुशांतचा कूल अंदाज आणि चार्म चाहत्यांना भावला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे गाणे सोनी म्युझिक इंडियाने देखील ट्विटरवर शेअर केले आहे. (सुशांत सिंह राजपूत याची 'दिल बेचारा' सिनेमातील को-स्टार संजना संघी हिने सोडली मुंबई; पहा पोस्ट)
पहा व्हिडिओ:
या सिनेमातून अभिनेत्री संजना संघी बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. तर कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा यांनी या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. सुशांतने डिरेक्टोरियल डेब्यूमध्ये साथ देण्याचे वचन दिले होते आणि ते त्याने पूर्ण केले, असे मुकेश छाबडा यांनी सांगितले.
Sony Music India Tweet:
Manny knocked his way into Kizie's life with all his heart and lively spirit. Set to the melody of the one and only, A.R. Rahman. Listen, love, let the magic do its trick. #DilBecharaTitleTrack out now! https://t.co/t2TCKcVGtZ pic.twitter.com/uI8bkKeJYt
— Sony Music India (@sonymusicindia) July 10, 2020
सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सिनेमा प्रदर्शित करणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. त्याचबरोबर डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणारा हा सिनेमा सब्सक्रिप्शन नसतानाही नि:शुल्क पाहता येणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2020 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

